शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात?; 'ते' 75 जिल्हे स्कॅनरखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 09:07 IST

CoronaVirus Marathi News: देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठी; आयसीएमआर आढावा घेणार

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तर दुसरीकडे देशातल्या जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) या जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे का, याचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे. सिवियर ऍक्युट रेस्पिरेटरी इलनेस (एसएआरआय) म्हणजेच श्वासोच्छवास घेताना येणाऱ्या समस्या आणि इन्फ्लुएंजासारख्या आजारांचा (आयएलआय) सामना करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान २५० जणांच्या तपासण्या करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नजर ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये अँटी बॉडी किट्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त जणांची तपासणी करण्याची योजना आयसीएमआरनं आखली होती. मात्र या किट्समधून मिळणाऱ्या निष्कर्षांमध्ये विसंगती आढळून येऊ लागल्यानं ही योजना गुंडाळण्यात आली. आता देशातल्या ७५ जिल्ह्यांमध्ये ईएलआयएसए (एंजाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट असे) टेस्ट किट्सच्या माध्यमातून चाचण्या घेऊन त्यातून मिळणाऱ्या आकडेवारीचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे.ईएलआयएसए टेस्ट किट्सदेखील अँटी बॉडी किट्स प्रमाणेच काम करतं. व्यक्तीच्या शरीरातील रक्तात अँटी बॉडी किती प्रमाणात सक्रिय आहेत, त्याची तपासणी ईएलआयएसए किट्सच्या माध्यमातून केली जाते. अद्याप या किट्सला आयसीएमआरनं मंजुरी दिलेली नाही. कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे का, ते तपासण्यासाठी आयसीएमआरनं मार्चमध्येही अशाच प्रकारे आढावा घेतला होता. देशात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचं आयसीएमआरनं आतापर्यंत अनेकदा म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या