शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : कोरोनाचा धसका! ATMमधून पैसे काढायला घाबरता?, मग 'या' दुकानातून काढू शकता रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 15:47 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती असल्याने अनेकजण एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यास घाबरत आहे. मात्र आता पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज नाही.

नवी दिल्ली - भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 50 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली होती. एटीएममधून पैसे काढणं तीन जवानांना महागात पडलं होतं. कोरोना व्हायरसचा प्रसार होण्याची भीती असल्याने अनेकजण एटीएममध्ये जाऊन पैसे काढण्यास घाबरत आहे. मात्र आता पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज नाही. कारण शेजारच्या दुकानातूनही पैसे काढता येणार आहेत. पीओएस (POS) मशीन्स असणाऱ्या दुकानांच्या माध्यमातून रोख रक्कम काढता येणार आहे. पैसे काढण्यासंदर्भात आरबीआयला विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची एक यादी आरबीआयने प्रसिद्ध केली आहे.

1. पीओएस टर्मिनल वापरून पैसे काढण्यासाठी कोणत्या कार्ड्सचा वापर करावा लागेल?

- ग्राहक डेबिट कार्डचा वापर करून पैसे काढू शकतात. बँकांनी जारी केलेल्या ओपन सिस्‍टम प्रीपेड कार्डांच्या माध्यमातून देखील पैसे काढू शकतात. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करू शकत नाही.

2. या सुविधेसाठी काय चार्ज आहे?

- यासाठी लागणारा चार्ज हा काढणार असणाऱ्या रकमेच्या 1 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल.

3. दुसऱ्या बँकाच्या पीओएस टर्मिनलमधून पैसे काढता येतील?

- होय. या गोष्टीचा फरक नाही पडत की तुमच्याकडे कोणत्या बँकेचे कार्ड आहे.

4. या सुविधेअंतर्गत पैसे काढण्याची काही मर्यादा आहे का?

- या  सुविधेअंतर्गत टियर 3 ते 6 पर्यंतच्या शहरांमध्ये एका कार्डमधून 2000 रुपये पर्यंतची रक्कम काढता येईल. तर टियर 1 आणि 2 च्या शहरांमध्ये एका कार्डमधून 1000 रुपये काढता येतील.

5. कोणती पावती मिळेल का?

- हो. दुकानदार पीओएस टर्मिनलमधून जनरेट झालेली पावती देईल.

6. ही सुविधा सुद्धा मर्चेंट एस्‍टॅबलिशमेंटमध्ये मिळते का? मला कसे कळेल की कोणत्या दुकानदाराकडे ही सुविधा उपलब्ध आहे?

- सर्व मर्चेंट एस्‍टॅबलिशमेंटमध्ये ही सुविधा उपलब्ध नाही आहे. ही सुविधा केवळ त्या दुकानदारांकडे उपलब्ध आहे, ज्यांना बँकांनी परवानगी दिली आहे. दुकानदारांना या सुविधेविषयी ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी लागेल. काही चार्ज असेल तर त्याबाबतही माहिती देणे आवश्यक आहे.

7. बँकांनी ही सुविधा देण्यासाठी आरबीआयची परवानगी आवश्यक आहे का?

- स्थानिक क्षेत्रीय बँका सोडल्यास ज्या बँकांना पीओएस टर्मिनल लावायचे आहे ते त्यांच्या बोर्डाची परवानगी घेऊन या सुविधेच्या माध्यमातून पैसे काढण्याची परवानगी देऊ शकतात. स्थानिक क्षेत्रीय बँकाना आरबीआयची परवानगी आवश्यक आहे.

8. या सुविधेबाबत आणखी माहिती कुठून मिळेल?

-आरबीआयने जारी केलेल्या खालील सर्क्यूलरमधून याबाबत माहिती मिळेल

DPSS.CO.PD.No.147/02.14.003/2009-10 dated July 22, 2009,

DPSS.CO.PD.No.563/02.14.003/2013-14 dated September 5, 2013,

DPSS.CO.PD.No.449/02.14.003/2015-16 dated August 27, 2015,

DPSS.CO.PD.No.501/02.14.003/2019-20 dated August 29, 2019 आणि DPSS.CO.PD.No.1465/02.14.003/2019-20 dated January 31, 2020

एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : योगी सरकारच्या निर्णयावर साक्षी महाराज नाराज; म्हणाले...

CoronaVirus News : 'कोरोना व्हायरसचा प्रसार वुहानच्या प्रयोगशाळेतून झाला'; अमेरिका ठाम

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याatmएटीएमMONEYपैसाbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक