शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 10:59 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संकट आणि आर्थिक आव्हानांबद्दल राहुल गांधींचा अभिजीत बॅनर्जींशी संवाद

नवी दिल्ली: कोरोचा संकट गहिरं होत असल्यानं अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानं वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी आज नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी संवाद साधला. मोदी सरकार देशवासीयांना दिलासा देण्यासाठी दुसरं आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत असताना बॅनर्जी यांनी एक महत्त्वाची सूचना केली. सर्वसामान्यांच्या हाती आता थेट पैसा देऊ नका. तो काही दिवसांनंतर द्या, असं बॅनर्जी म्हणाले.देशातल्या जनतेच्या हाती थेट पैसा दिल्यास समस्या कमी होण्याऐवजी त्या वाढतील, अशी भीती बॅनर्जींनी व्यक्त केली. 'अर्थव्यवस्था ठप्प असताना लोकांच्या हाती थेट पैसा देणं योग्य ठरणार नाही. उत्पादन आणि मागणी यामधील अंतर वाढल्यास महागाई वाढेल. त्यामुळे सरकारनं आता लोकांच्या हाती पैसा न देता दोन महिन्यांनंतर द्यावा. लॉकडाऊन संपल्यानंतर तो लोकांना खर्च करता येईल,' असं बॅनर्जी यांनी म्हटलं.काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या योजना अतिशय चांगल्या आहेत. मात्र आताचं सरकार त्या योजना नीट लागू करत नसल्याचं निरीक्षण बॅनर्जींनी नोंदवलं. यूपीए सरकारच्या अनेक योजना चांगल्या होत्या. या सरकारनं त्याच योजनांवर पुढे काम केलं याकडे लक्ष वेधताना त्यांनी आधार कार्डचा संदर्भ दिला. यूपीए सरकारच्या अनेक योजना कोरोना संकटाच्या काळातही उपयोगी ठरू शकतात. मात्र आज त्यांची देशभरात अंमलबजावणी केली जात नाही, असं बॅनर्जी म्हणाले.येत्या काळात बँकांसमोरील समस्या आणखी वाढतील आणि नोकऱ्या वाचवणंदेखील कठीण होईल, असा मुद्दा राहुल यांनी उपस्थित केला. त्यावर खरंच अशी परिस्थिती निर्माण होणार असल्याचं बॅनर्जी म्हणाले. देशाला आर्थिक पॅकेजची गरज आहे. अमेरिका, जपाननं अशा पॅकेजची घोषणा केली आहे. मात्र आपल्याकडे अद्याप अशा प्रकारच्या पॅकेजची घोषणा करण्यात आलेली नाही. लहान उद्योगांना आर्थिक मदतीची गरज असून चालू तिमाहीचं कर्ज माफ करण्यात यावं, असं मत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं."त्यांच्या कुटुंबावरही कोणी तरी फुले उधळा, त्यांच्यासाठीही बँड वाजवा, पणत्या-मेणबत्त्या पेटवा"ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा; मोदींनाही ई-मेल करणारदिलासादायक! गेल्या २४ तासांत १०७४ जण कोरोनामुक्त; बऱ्या होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण २८ टक्क्यांवर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या