शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना जाणार नाही, त्याच्यासोबतच जगणं शिकावं लागेल, केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2020 22:08 IST

नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र ...

ठळक मुद्देकेजरीवाल म्हणाले लॉकडाउनमुळे केवळ कोरोनाचा प्रसार थांबेलकेजरीवालांनी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केलेयावेळी केजरीवालांनी अॅक्शन प्लॅनही सांगितला

नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, की त्यांनी वेळेत लॉकडाउनची घोषणा केली. या काळात आम्ही कोविड हेल्थ सेंटर तयार केले, पीपीई किट आणि टेस्ट किट जमवल्या. मात्र, आता आपल्याला कोरोनासोबतच जगायची सवय लावावी लागेल. आम्ही लोक पूर्णपणे तयार आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.

केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन -यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अॅक्शन प्लॅनही सांगितला. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लॉकडाउन केल्याने देश कोरोनामुक्त होणार नाही. आपण विचार करत असाल, की एखाद्या भागात लॉकडाउन केले, तर तेथील कोरोना बाधितांची संख्या शून्य होईल, तर असे जगात कुठेही होत नाहीये. आपण संपूर्ण दिल्लीलासुद्धा लॉकडाउन केले, तरी कोरोना केसेस संपणार नाहीत. लॉकडाउनमुळे कोरोना केवळ कमी होऊ शकतो.

हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल

कोरोनासोबतच जगावे लागेल - केजरीवाल म्हणाले, आता अर्थव्यवस्था खुली करण्याची वेळ आली आहे. आता दिल्ली पूर्णपणे तयार आहे. लॉकडाउननंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी त्यासाठी आपण तयार रहायला हवे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला तयारी करायला सांगावी आणि हळू-हळू राज्यांतील लॉकडाउन हटवावे. जे रेड झोन आहेत केवळ तेच बंद ठेवायला हवेत. इतर भाग खुले करायला हवेत. अशात लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

CoronaVirus, LockdownNews : सरकार दुसऱ्यांदा आर्थिक पॅकेज जाहीर करण्याच्या तयारीत, मोदींची अर्थमंत्री सीतारमण यांच्याशी चर्चा

तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू -मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील केवळ तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू झाले आहेत. मरकजमधून 3200 लोक काढण्यात आले. त्यापैकी 1100 लोक कोरोनाग्रस्त सापडले. 700 ते 800 परदेशातून आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. दिल्लीने बरेच कंट्रोल केले आहे. 

CoronaVirus, LockdownNews: छोट्या व्यवसायिकांना मोठा दिलासा, सरकारच्या आदेशानंतर 'ही' बँक देत आहे उधार पैसे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारState Governmentराज्य सरकारAam Admi partyआम आदमी पार्टी