शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

CoronaVirus : महाराष्ट्र दुसऱ्या लाटेच्या वाटेवर! केंद्र सरकारचा इशारा; लसीकरणाचा वेग वाढविण्याची सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 07:00 IST

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली असून, देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त असलेल्या दहा जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातीलच आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची ही चिन्हे आहेत, सबब लसीकरणाचा वेग वाढविला जावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. (CoronaVirus Maharashtra on the way to the second wave! Central government warning; Suggestions for speeding up vaccination) केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली. केंद्रीय पथकाने अलीकडेच महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी केली. त्या पाहणीच्या आधारावरच केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्र लिहिले आहे. त्यांनी पत्रात पुढील मुद्दे मांडले आहेत. 

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ कायम; यंत्रणांसमोर चिंतामुंबईत मंगळवारी १ हजार ९२२ नवे कोरोनाबाधित आढळून आले असून, चौघांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांचा आकडा ३ लाख ४७ हजार ५८१ वर पोहोचला आहे. २,२३,०००+ - देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा  राज्यात नवे रुग्ण - १७,८६४एकूण बाधित - २३,४७,३२८एकूण मृत्यू - ५२,९९६

१२,७४,००० डोस मिळणार -महाराष्ट्राला १८ मार्चपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसींचे आणखी १२,७४,००० डोस प्राप्त होणार आहेत. राज्यात लसींचा तुटवडा जाणवू दिला जाणार नसल्याचेही राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे.

‘आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या’कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्याला २० लाख डोस उपलब्ध करून द्या. अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली. 

पंतप्रधानांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

जिल्हा प्रशासन गंभीर नसल्याचे ताशेरे- कोरोनाबाधितांचा शोध घेणे, नमुने गोळा करणे, चाचण्या करणे यासंदर्भात मर्यादित प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. - औरंगाबाद येथील जिल्हा रुग्णालय, तसेच नाशिकमधील वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण लक्षणीय आहे. - यासंदर्भात सखोल तपास होणे गरजेचे आहे. कोरोनाच्या बदलत्या स्थितीबाबत जिल्हा प्रशासने फारशी गंभीर नाहीत. - आपण केलेल्या बंदोबस्तावर ते खूश असून, हे योग्य नाही. त्यांनी प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य सचिव म्हणाले.

३४ दिवसांमध्ये २५४% वाढसक्रिय रुग्णांच्या संख्येत ११ फेब्रुवारी रोजी राज्यात ३६,९१७ एवढे कोरोनाचे उपचाराधीन रुग्ण होते. आता १५ मार्च रोजी १,३०,५४७  एवढे सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजेच ३४ दिवसांमध्ये यात जवळपास २५४ टक्के वाढ झाली आहे.

केंद्र सरकारने राज्याला सुनावले -- बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करण्याची प्रक्रियाही धिम्या गतीने- शहरी, तसेच ग्रामीण भागातही लोकांमध्ये कोरोनाविषयी बेफिकिरी, शिस्तीचे पालन होत नाही 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकार