शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

देशातील लॉकडाउनचे निर्बंध फारच कडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 05:22 IST

राजीव बजाज; कोरोनाविरूद्धच्या लढ्याबाबत व्यक्त केली चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात औद्योगिक क्षेत्राला सरकारकडून अत्यल्प पाठिंबा मिळाला असून देशातील लॉकडाऊनचे निर्बंध फारच कडक असल्याची खंत उद्योजक राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे. उद्योगांना आपल्या बळावरच या संकटाचा मुकाबला करावा लागेल. या संकटातून वाचण्यासाठी उद्योजकांना पदरमोड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मतही बजाज आॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले आहे.एका अर्थविषयक इंग्रजी दैनिकामधील लेखामध्ये राजीव बजाज यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात करण्यात आलेले लॉकडाउन हे भरमसाठ प्रमाणात असून अन्य कोणत्याही देशाने असे केलेले नाही. सरकारने योजलेल्या या उपायामुळे आपण या विषाणू विरुद्धच्या लढ्यामध्ये कमजोर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेची चाके फिरती ठेवण्यासाठी आपण आपल्यामधील वृद्ध आणि दुबळ्या व्यक्तींना घरी ठेवू. सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करू मात्र योग्य ती दक्षता घेऊन तरूण आणि सशक्त लोकांना काम करण्यासाठी परवानगी दिल्यास अर्थव्यवस्थेची चाके फिरती राहतील. मात्र हे करताना स्वच्छता, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही तत्वे पाळणे अतिशय महत्वाचे ठरणारे असल्याचे प्रतिपादनही बजाज यांनी या लेखामध्ये केले आहे.सर्वच भारतीय हे अडाणी, गावंढळ आणि कोणतीही शिस्त नसलेले आहेत, असे माझे मुळीच मत नाही. त्यामुळे त्यांना हाकण्यासाठी मेंढ्यांच्या कळपाला जसा कोणीतरी हवा असतो, तशा व्यक्तीची गरज नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्यामुळे सध्याचे धोरण हे भविष्यात चालू ठेवणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळेच जर व्हायरसवर नियंत्रण आले नाही तर लॉकडाउन वाढविले जाण्याची वाटत असलेली भीती अनाठाई नसल्याचेही बजाज यांनी म्हंटले आहे.आपले सुमारे अर्धे उत्पादन निर्यात करणारी बजाज आॅटो ही नफा कमविणारी कंपनी असून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. त्यामुळेच आम्ही आजही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. त्यामुळेच आमचे डीलर्स, पुरवठादार आणि सर्व प्रकारचे कामगार यांना असे आश्वासन देतो की, येत्या १४ तारखेपर्यंतच्या लॉकडाउनला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही बजाज यांनी म्हंटले आहे.जोपर्यंत सध्याची परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत उद्योगांना आपले अंदाजपत्रक रोखून धरावे लागणार आहे. तसेच त्यांचे मार्केटिंगचे बजेट शून्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे डीलर्स क्रेडीटवरील व्याज माफ करण्याची मागणी करतील. तसेच कामगारांच्या पगारातही कपात करावी लागण्याची शक्यता दिसत आहे. या घडीला तरी नोकर कपातीची शक्यता दिसत नसल्याचे त्यांनी या लेखामध्ये पुढे म्हटले आहे.होमिओपॅथीलाका वगळले?भारतामध्ये स्वतंत्र असे आयुष मंत्रालय असून होमिओपॅथीतील जगातील चांगले संशोधन केंद्र असताना कोरोना विरुद्धच्या लढ्यामधून होमिओपॅथीला का वगळले गेले ते समजू शकत नाही, असे बजाज यांनी म्हंटले आहे. होमिओपॅथीचे फारसे साईड इफेक्ट नसल्याचे जगभर मान्य झाले असताना या पॅथीला वगळणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे निसर्गाेपचारांचाही उपयोग या लढ्यासाठी करता येऊ शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या