शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Lockdown: लॉकडाऊन वाढला, पण 'ग्रीन झोन'ला दिलासा; 'ऑरेंज झोन'मध्येही काही व्यवहार सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 19:16 IST

Coronavirus Lockdown देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवला; १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. १७ मेपर्यंत देशातील लॉकडाऊन कायम राहील. या काळात कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या रेड झोनमध्ये लागू असलेले निर्बंध तसेच राहतील. मात्र ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ऑरेंज झोनमध्ये काही सवलती दिल्या जाणार असून ग्रीन झोनमधील आर्थिक व्यवहार आणि उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होतील. गृह मंत्रालयानं दिलेल्या आदेशांनुसार, ग्रीन झोनमध्ये बससेवा सुरू करण्यात येईल. मात्र या बसेस ५० टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील. बस आगारांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी नसतील. ऑरेंज झोनमधल्या बससेवा सुरू केल्या जाणार नाहीत. मात्र या भागांमध्ये कॅब सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कॅबमध्ये चालकासोबत केवळ एकच प्रवासी असेल. ऑरेंज झोनमधल्या औद्योगिक सेवा सुरू होतील. औद्योगिक संकुलंदेखील सुरू करण्यास परवानगी दिली गेली आहे. मात्र रेड झोनमधील निर्बंध कायम राहतील. या ठिकाणी असलेली दुकानं सुरू होणार नाहीत. केवळ जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं खुली राहतील. देशात एकूण ७३९ जिल्हे आहेत. यातील जवळपास ४० टक्के म्हणजेच ३०७ जिल्ह्यांचा समावेश केंद्र सरकारनं ग्रीन झोनमध्ये केला आहे. ३ मेनंतर या जिल्ह्यांमधले कारखाने, दुकानं, लहान-मोठे उद्योग, वाहतूक आणि अन्य सेवा काही अटी-शर्तींसह सुरू होतील. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर रेड झोनमध्ये लागू असलेले कठोर निर्बंध कायम राहणार आहेत.देशातील लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यांनी वाढवला, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणाआता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणीमोठी बातमी; लॉकडाऊनमुळे अडकलेले मजूर आणि विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी धावणार विशेष ट्रेन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या