शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
3
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
4
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
5
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
6
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
7
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
8
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
9
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
10
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
11
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
12
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
13
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
14
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
15
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
16
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
17
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
18
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
19
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
20
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क

coronavirus: दिल्लीत लॉकडाऊनच्या घोषणेनंतर मजुरांची गावी जाण्यासाठी धावपळ, बस स्थानकात उसळली गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 09:00 IST

lockdown in delhi 2021: लॉकडाऊनच्या घोषणेनंतर परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे.

ठळक मुद्दे संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी सुरू केली धावपळ दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण झाली ताजी

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी दिल्लीमध्ये ६ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. (lockdown in delhi 2021) ही संचारबंदी काल रात्री १० वाजल्यापासून लागू झाली असून, २६ एप्रिल रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर दिल्लीमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, परराज्यांमधील मजुरांनी गावी जाण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. दिल्लीतील आनंद विहार टर्मिनल या बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी उसळल्याने गेल्या वर्षच्या कामगारांच्या पलायनाची आठवण ताजी झाली आहे. ( After the announcement of the lockdown in Delhi, the workers rushed to the village, the crowd at the bus station)

दिल्लीत सहा दिवसांच्या संचारबंदीची घोषणा झाल्यानंतर आनंदविहार पोलीस ठाण्यात परराज्यातील स्थलांतरीत मजुरांची मोठी गर्दी झाली. भीती आणि शंका लोकांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मजुरांना दिल्लीत राहण्याचे आवाहन केले होते. तरीही त्यांच्या आवाहनाचा परिणाम झालेला दिसला नाही. अनेक मजुरांना लवकरात लवकर गावी जाण्याची घाई दिसून येत होती. 

हे दृष्य पाहिल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना दिल्लीत थांबवण्याचे पुन्हा एकदा आवाहन केले. सरकार पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. हे केवळ लहान लॉकडाऊन आहे. तसेच त्याचा अवधी वाढणार नाही. तो वाढवावा लागणार नाही. तुम्ही दिल्ली सोडून जाऊ नका. हा निर्णय आम्हाला नाईलाजास्तव घ्यावा लागला आहे. या काळात आम्ही दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर बेड्सची व्यवस्था करू. केंद्र सरकार आम्हाला मदत करत आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवालMigrationस्थलांतरण