शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: देशात लवकरच Lockdown 2; नेमकं काय बंद आणि काय सुरू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 11:26 IST

coronavirus २१ दिवसांचा लॉकडाऊन संपत आला तरीही कोरोना नियंत्रणात नाही

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. हा कालावधी संपत आला असला तरीही परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. उलट दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यातच अर्थव्यवस्थेसमोरील अडचणीही वाढताना दिसत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं आव्हान सरकारसमोर आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवताना सरकार शेत मालासह कारखाने आणि वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्याची शक्यता आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या भागांमध्ये निर्बंध कायम राहतील. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये पंतप्रधानांनी याबद्दलचे संकेत दिले होते. लॉकडाऊनमुळे महसुलात ५० ते ७५ टक्के घट झाल्याचं मोदी म्हणाले होते.लॉकडाऊन २ मध्ये शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या सवलती सुरू राहतील. धान्य उत्पादन आणि शेतमालाची विक्री यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत, याची काळजी लॉकडाऊन २ मध्ये सरकार घेईल. रेड (१५ पेक्षा जास्त रुग्ण असलेले जिल्हे) आणि ऑरेंज (१५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे) झोनमध्ये भाज्या थेट घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यामुळे रस्ते आणि बाजारांमध्ये होणारी गर्दी टाळता येईल.अर्थव्यवस्था आणि कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार लहान आणि मध्यम उद्योग सुरू करण्याची परवानगी देऊ शकतं. कारखान्यातल्या मजुरांनी आतच राहून काम करावं, घरी जाऊ नये, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अशा सूचना सरकारकडून दिल्या जाण्याची शक्यता आहे. या कारखान्यातील मजुरांची व्यवस्था जवळच कॅम्पमध्ये करण्यात येईल आणि त्यांना विशेष ट्रेन किंवा बसनं कारखान्यापर्यंत आणलं जाईल. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी