शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus Live Updates: पुढील १०० दिवसांपर्यंत कोरोनाची दुसरी लाट; २५ लाखांहून अधिक लोकांना बाधा होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 07:14 IST

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे

हरिश गुप्तानवी दिल्ली : भारतातील कोविड-१९ साथीची दुसऱ्या लाटेचा प्रभाव मेअखरपर्यंत राहू शकतो; परंतु, एप्रिलच्या मध्यापर्यंत या लाटेचा जोर वाढू शकतो. पंधरा फेब्रुवारी सुरु झालेली कोविड-१९ साथीच्या दुसरी लाट शंभर दिवसापर्यंत राहू शकते, असे स्पष्ट करतांना भारतीय स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाने दुसऱ्या लाटेदरम्यान २५ लाखांहून अधिक लोकांना कोविडची बाधा होऊ शकते, असेही संकेत आहेत.

एसबीआयच्या आर्थिक संशोधन विभागाने अध्ययनानुसार, कोविडच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त आहे. तथापि, लस उपलब्ध असल्याने लक्षणीय फरक होईल. एसबीआय नियमितपणे कोविड संशोधन अध्ययन करीत आहे. राजस्थान, गुजरात, केरळ, उत्तरांड, हरयाणा यासारख्या राज्यातील ज्येष्ठांच्या लोकसंख्येच्या २० टक्के ६० वर्षे वयाच्या लोकांचे लसीकरण झाले आहे. तथापि, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचे प्रमाण कमी आहे.

अन्य एका अहवालानुसार, भारतात ज्या वेगाने कोरोना संसर्गाचा फैलाव होत आहे, त्यापेक्षा भारतातील लसीकरणाचा दर अधिक आहे. दोन महिन्यांत भारतातील एकूण कोरोना रुग्ण संख्येच्या तुलनेत ५ कोटी ३० लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आला आहे. मागच्या एक वर्षात १ कोटी १७ लाख लोकांना कोरोनाची बाधा झाली. दिलासादायक म्हणजे कोविडच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग पसरण्याचा दर (आर-फॅक्टर) १.३२ आहे. २०२० मध्ये २७ मार्च ते ६ एप्रिल दरम्यान हा दर १.८३ टक्के होता. नंतर हा दर एप्रिलच्या दुसऱ्या आणि मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याते १.२३ वर उतरला होता.

गेल्या २४ तासांत देशात आढळलेले ५३,४७६ बाधित

कोरोनाबाधितांचा नवा उच्चांक, रिकव्हरी रेटमध्येही घट

देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली असून, गुरुवारी गेल्या २४ तासांत तब्बल ५३ हजार ४७६ बाधितांची नोंद झाली. २३ ऑक्टोबरपासून प्रथमच एका दिवसात ५० हजारांहून अधिक बाधित आढळून आले आहेत. गेल्या दहा दिवसांत बाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. रिकव्हरी रेट ९५.२८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. 

लॉकडाऊन प्रभावी ठरला का?लॉकडाऊन निष्प्रभावी ठरेल. महाराष्ट्र आणि पंजाबसह इतर राज्य याची उदाहरणे आहेत. तेव्हा कोरोनावर मात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणे, हाच एकमात्र प्रभावी उपाय असल्याचे अहवालात नमूद आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील संसर्ग फैलावण्याचे प्रमाण जवळपास स्थिर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या