शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावतोय पण...; नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 10:59 IST

CoronaVirus Live Updates : गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल तीन कोटीवर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग थोडा मंदावला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत होती. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. असं असताना दुसरीकडे मृतांचा आकडा सतत वाढत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. मंगळवारी (1 फेब्रुवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे  1,67,059 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1192 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा चार लाख 90 हजारांवर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 17,43,059 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर काही जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. रिकव्हरी रेट 94.6 टक्क्यांवर आहे. सलग चौथ्या दिवशी कोरोना मृतांची संख्या वाढली आहे. 

देशामध्ये सोमवारी 959, रविवारी 893, शनिवारी 871 रुग्णांनी जीव गमावला. केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक या पाच राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल 1,66,68,48,204 लोकांचं लसीकरण झालं आहे. कोरोना लसीकरणाबाबत आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून सरकारने मोठा खुलासा केला आहे. लस न घेणाऱ्यांसाठी कोरोना 'काळ' ठरत असल्याचं म्हटलं आहे. पुन्हा एकदा लसीकरणाचं महत्त्व पटवून दिलं आहे. कोविडपासून बचाव करायचा असेल तर लसीकरण अत्यंत महत्त्वाचं असल्याचें केंद्र सरकारने सांगितलं आहे. लस घेतली नसेल तर कसा धोका वाढतो, हे सांगण्यासाठी यावेळी दिल्लीतील कोरोना मृत्यूंबाबतचा तपशील देण्यात आला.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रांचे ( NCDC ) संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली व लसीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. ज्यांनी कोविड प्रतिबंधक लस घेतली नाही आणि ज्यांना इतर गंभीर आजार आहेत अशा व्यक्ती 'हाय रिस्क' गटात मोडतात. प्रातिनिधिक स्वरूपात नुसती राजधानी दिल्लीतील आकडेवारी पाहिली तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 64 टक्के रुग्ण लस घेतली नाही असे होते किंवा सहव्याधीग्रस्त होते. ही बाब लक्षात घेता लसीकरणाबाबत टाळाटाळ करू नका, अशी विनंतीच सिंह यांनी केली. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनीही यावेळी लसीकरणावरच जोर दिला. कोरोना विरोधी लढ्यात लसीकरण हे सर्वात प्रमुख हत्यार ठरलं आहे. त्यामुळे लस घेतली नसेल तर तुम्ही तुमचाच जीव धोक्यात घालत आहात हे स्पष्ट आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत