शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

CoronaVirus Live Updates : धोका वाढला! गेल्या 24 तासांत तब्बल 96,982 नवे रुग्ण; कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 10:48 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोनाने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अमेरिका, ब्राझीलसारखे देश कोरोनापुढे हतबल झाले आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 13 कोटींवर गेली आहे. तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशामध्ये कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. कोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. CoronaVirus Live Updates India reports 96,982 new COVID19 cases 446 deaths in the last 24 hours

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल 96,982 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 446 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1,26,86,049 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात दीड लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. 

कोरोना संकटातील धक्कादायक वास्तव! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला होतोय व्हेंटिलेटरचा पुरवठा

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा होत असल्याची माहिती आता मिळत आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच गुजरातमध्ये देखील कोरोनाने थैमान घातले आहे. याच दरम्यान हा भयंकर प्रकार समोर आला आहे. सूरतमध्ये चक्क कचरा वाहून नेणाऱ्या ट्रकमधून रुग्णालयात व्हेंटिलेटर नेण्यात आले आहेत. व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याने 34 व्हेंटिलेटर ट्रकमधून नेण्यात आले. गुजरातमधील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत सातत्याने होणारी वाढ लक्षात घेऊन सरकारने रुग्णालयांमध्ये तुटवडा भासू लागल्याने गुजरात सरकारने वलसाड येथून सूरतला 34 व्हेंटिलेटरचा पुरवठा करण्याचा आदेश दिला होता. सरकारच्या आदेशानंतर सूरत महापालिकेने व्हेंटिलेटर आणण्यासाठी वलसाडला कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रक पाठवला होता. 

कोरोनाचा हाहाकार! "येत्या दोन आठवड्यात परिस्थिती गंभीर, वेगाने रुग्णसंख्या वाढणार", तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशनच्या माध्यमातून काळजी घेण्यात येत आहे. मात्र तरी देखील कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. याच दरम्यान आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग जगभरात थैमान घालणार असून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होणार असल्याचा अंदाज अमेरिकन साथीचा रोग विशेषज्ञ मायकल ओस्टरहोम यांनी वर्तवला आहे. ओस्टरहोम यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महासाथीचा आजार पाचव्या श्रेणीतील चक्रीवादळासारखा आहे. येत्या काही दिवसात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. ही संख्या आतापर्यंतच्या रुग्णांपेत्रा अधिक असणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लस