शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ! गेल्या 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण, एका दिवसात 56 टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 10:35 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.

नवी दिल्ली - वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 29 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काही ठिकाणी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना धडकी भरवणारी आकडेवारी सातत्याने समोर येत आहे. 

गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता टेन्शन वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. 24 तासांत 90 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका दिवसात तब्बल 56 टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (6 जानेवारी) देशात 24 तासांत कोरोनाचे 90,928 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 325 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,82,876 वर पोहोचला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 2,85,401 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,43,41,009 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. 

देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाचे थैमान 

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 2,630 वर पोहोचला आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात 797 आणि दिल्लीत 465 रुग्ण आहेत. ओमायक्रॉनच्या 2,630 रुग्णांपैकी 995 जण बरे झाले आहेत. देशातील पाच राज्यांमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. नव्या रुग्णांपैकी 66.97 टक्के रुग्ण या पाच राज्यामधील आहेत. तर फक्त महाराष्ट्रात 29.19 टक्के रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू आणि केरळचा समावेश आहे. देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. 

'देशात कोरोनाची तिसरी तर दिल्लीत 'पाचवी लाट' आलीय'

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी देशात कोरोनाची तिसरी लाट आली असून दिल्लीत पाचवी लाट आली आहे. आज जवळपास 10,000 नवे रुग्ण आढळतील आणि पॉझिटिव्ह रेट 10% असेल असं म्हटलं आहे. संपूर्ण देशात कोरोना अत्यंत वेगाने पसरत आहे पण आता तो खूपच सौम्य झाला आहे. त्यामुळे जास्त घाबरण्याची गरज नाही. होम आयसोलेशन आवश्यक आहे असं देखील सत्येंद्र जैन यांनी म्हटलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये आत्तापर्यंत कोविड रुग्णांसाठी 10% बेड होते पण आता त्यांना 40% राखीव ठेवावे असं सांगितलं आहे. सरकारी रुग्णालयातील सुमारे 2 टक्के बेड भरलेले आहेत असं देखील जैन यांनी सांगितलं. दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या करण्याची क्षमता देखील वाढवण्यात आली आहे. याआधी दिवसाला 50 ते 60 हजार टेस्ट होत होत्या. पण आता दररोज तीन लाख टेस्ट करण्याची क्षमता आहे. तसेच आवश्यक ती पावलं उचलली जात असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसOmicron Variantओमायक्रॉनIndiaभारत