शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! रुग्णसंख्येत झाली घट; गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 10:34 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईन आणि आयसोलेशनच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशभरात योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून काही ठिकाणी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. सध्या देशात कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. मात्र याच दरम्यान अनेकदा नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ देखील होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला आहे. असं असताना आता थोडा दिलासा मिळाला आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. 

गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे साडे सहा हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.  भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (14 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण आढळून आले आहेत. रिकव्हरी रेट 98.67 टक्क्यांवर पोहोचला आहे. डेली पॉझिटिव्हिटी रेट 2.05 टक्के तर वीकली पॉझिटिव्हिटी रेट 2.32 टक्के झाला आहे. 

देशात वाढणाऱ्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी चर्चा केली. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवण्याचं आवाहन त्यांनी केले.  आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी सांगितले की, कोरोना संक्रमण अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. अशावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचे लसीकरण वाढवलं पाहिजे. त्याचसोबत वृद्धांना बूस्टर डोस देण्यावरही विशेष लक्ष ठेवले पाहिजे. कोरोना व्हायरसच्या विविध व्हेरिएंटची ओळख पटवण्यासाठी जीनोम सीक्वेसिंगही वाढवलं पाहिजे. 

सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राज्यातील कोरोना संक्रमणाचाही बैठकीत आढावा घेतला. कोरोनाचा धोका टळला नाही. काही राज्यात कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सरकारनं सतर्क राहणं गरजेचे आहे. कोविड नियमांचे पालनही करावे. मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर पाळणे याचीही जनजागृती लोकांमध्ये करायला हवी. काही राज्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णात वाढ होताना दिसत आहे. त्याचसोबत जिल्हा आणि राज्यात कोविड 19 टेस्टिंग कमी झाल्याचं दिसून आले. कोरोना चाचणीत वाढ करावी अशा सूचना केंद्राने सर्व राज्यांना दिल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस