शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

CoronaVirus Live Updates : देशात झपाट्याने वाढतोय कोरोना, गेल्या 24 तासांत 12,213 नवे रुग्ण; 109 दिवसांनी झाली मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:12 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा विस्फोट होत आहे. रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल 54 कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ समोर आला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. गुरुवारी (16 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,213 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 524803 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी अनेकांवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत कालच्या तुलनेत आज 38.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर पॉझिटिव्हिटी रेटही 2.35 टक्क्यांवर पोहोचला आहे. पाच राज्यांत कोरोनाचे थैमान पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र, केरळ, दिल्ली, कर्नाटक आणि हरियाणामध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्र 4,024, केरळ 3,488, दिल्ली 1,375, कर्नाटक 648 आणि हरियाणामध्ये 596 रुग्ण आढळले आहेत. या पाच राज्यांत तब्बल 82.96 टक्के रुग्ण आढळून आले आहेत. फक्त महाराष्ट्रात 32.95 टक्के रुग्ण सापडले आहेत. 

ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे मुंबईत थैमान; स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के रुग्ण आढळले पॉझिटिव्ह

मुंबईकरांसाठी आता धोक्याची घंटा आहे. कारण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. नव्या रुग्णांची संख्या एका हजाराहून अधिक आहे. ओमायक्रॉनच्या सब व्हेरिएंटचे थैमान पाहायला मिळत आहे. 12 व्या जीनोम सीक्वेंसिंग दरम्यान स्वॅब टेस्टचा जो रिझल्ट समोर आला आहे तो चिंताजनक आहे. स्वॅब टेस्टमध्ये 99.5 टक्के लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, 14 ते 24 मे पर्यंत करण्यात आलेल्या जीनोम सीक्वेंसिगमध्ये 279 लोकांचे सँपल टेस्टसाठी पाठवले होते. 279 मधील तब्बल 278 लोक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने संक्रमित आहेत. एका रुग्णाला डेल्टा स्ट्रेनची लागण झाली आहे. बीएमसीच्या वतीने याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सँपलमधील 202 हे मुंबईचे होते.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस