शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
4
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
5
आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदसेनेच्या नेत्यावर बंदूक
6
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
7
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
8
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
9
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
10
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
11
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
12
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
13
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
14
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
15
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
16
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
17
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
18
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
19
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
20
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी

CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गुळण्या करून कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ओळखा; ICMR ने दिली नव्या पद्धतीला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 16:05 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : नव्या 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2,77,29,247 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,73,790 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 3,617 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,22,512 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना संक्रमणादरम्यान करोना चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगीही देण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरिकांना फक्त तीन तासांत या कोरोना चाचणीचा रिपोर्ट मिळू शकेल. 

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसहीत एका नवा टप्पा गाठला आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीची ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. सलाईन गार्गल आरटी-पीसीआर या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करून ती एका सामान्य 'कलेक्शन ट्यूब'मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात, NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. 

सोल्युशन गरम केल्यानंतर एका 'RNA' टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशनवर 'आरटी-पीसीआर' प्रक्रिया केली जाते. 'नीरी'चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं. लोक स्वतःहून कोरोना संसर्गाची चाचणी करू शकतील कारण ही प्रक्रिया 'सेल्फ सॅम्पलिंग'ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रांवर वाट पाहण्याची किंवा गर्दीत उभं राहण्याची गरज लागणार नाही. यामुळे बराचसा वेळही वाचतो. 

नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसंच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरेल, असंही डॉ. खैरनार यांनी म्हटलं आहे.  तर दुसरीकडे नाकातून स्वॅब घेण्यासाठी अधिक वेळ लागतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. मात्र असं असताना मृतांच्या आकडेवारीने चिंता वाढवली आहे. कोरोना मृतांच्या संख्येत वाढ होताना पाहायला मिळत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत असताना मृतांचा आकडा वाढत असल्यामागचं नेमकं कारण आता तज्ज्ञांनी सांगितलं आहे. कोरोना आकडेवारीनुसार, 9 मे नंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्या कमी होत आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संख्येत होतेय घट पण मृतांचा आकडा धडकी भरवणारा; डॉक्टरांनी सांगितलं नेमकं कारण

कोरोना मृतांच्या आकड्यामध्ये मात्र कोणताच फरक पाहायला मिळत नाही. कोरोनामुळे जवळपास चार हजारहून अधिक लोकांना दररोज आपला जीव गमवाव लागत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. पब्लिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांच लहारिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्येत कमी पाहायला मिळत असली तरी मृतांच्या आकड्यावर याचा परिणाम हा 14 दिवसांनंतर पाहायला मिळेल. संसर्गाचे हे एक चक्र आहे. दुसऱ्या देशामध्ये देखील असंच चित्र पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील काही दिवसांनी कोरोना मृतांच्या संख्येत घट झाली आहे. 9 मे पासून भारतात कोरोनाचा ग्राफ खाली येत असलेला पाहायला मिळत असल्याचं लहारिया यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत