शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! 5 दिवसांच्या चिमुकलीचा कोरोनामुळे मृत्यू; आई निगेटिव्ह अन् बाळ पॉझिटिव्ह, डॉक्टरही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 08:24 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. कोरोनामुळे अवघ्या पाच दिवसांचा बाळाने आपला जीव गमावला आहे.

नवी दिल्ली -  भारतातही कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. लहान मुलांना देखील कोरोनाची लागण होत आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे अवघ्या पाच दिवसांचा बाळाने आपला जीव गमावला आहे. 

ग्वाल्हेरमध्ये कोरोनामुळे अवघ्या 5 दिवसांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. बाळाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आणि आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मुलीच्या जन्मानंतर आई आणि बाळाची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यावेळी हा खुलासा झाला. मुलीच्या जन्माच्या तीन दिवसांनंतर ती आजारी असल्याने तिला ग्वाल्हेरच्या कमलाराजा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं. येथे 2 दिवस मुलीवर उपचार सुरू होते. यानंतर मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मुलीच्या आईचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्यामुळे आरोग्य विभाग हैराण झाला.

गेल्या 24 तासांत 927 मुलं कोरोना पॉझिटिव्ह; प्रशासनाच्या चिंतेत भर

आरोग्य विभागाकडून कुटुंबातील अन्य सदस्यांच्या टेस्ट केल्या जात आहे. याशिवाय ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिव्हील सर्जन, स्त्री विभागातील एचओडीसह 12 हून अधिक डॉक्टर आणि नर्सेस कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लहान मुलांना देखील आता कोरोनाचा संसर्ग होत आहे. ओडिशामध्ये तब्बल 927 मुलांना तर भोपाळमध्ये 170 मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. ओडिशामध्ये शनिवारी संसर्गाची 8,845 नवीन प्रकरणे आढळल्यानंतर, येथील एकूण संक्रमित लोकांची संख्या 11,96,140 झाली आहे. नव्या रुग्णांमध्ये 927 मुले देखील आहेत. 

170 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत 11274 कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काल हा आकडा 9385 होता. भोपाळच्या नवीन प्रकरणांमध्ये, एका दिवसात 170 मुलं पॉझिटिव्ह आल्यानंतर राज्य सरकार देखील सतर्क झाले आहे. रुग्णालयात बालरोग वैद्यकीय सेवा वाढविण्यात येत आहेत. मध्य प्रदेशमध्ये संसर्ग दर 12% पर्यंत वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाचा धडकी भरवणारा ग्राफ पुन्हा समोर आला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश