शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: दिलासादायक! उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या १ महिन्यानंतर ९ लाखांच्या खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2020 06:59 IST

CoronaVirus News: रुग्णसंख्या ६९ लाखांवर; ५९ लाख लोक आजारातून झाले बरे

नवी दिल्ली : देशामध्ये नव्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांचा आकडा गेल्या महिनाभरात प्रथमच नऊ लाखांपेक्षा कमी झाला आहे. शुक्रवारी कोरोनाचे ७०,९४६ नवे रुग्ण आढळून आले असून रुग्णांची एकूण संख्या ६९ लाखांवर पोहोचली आहे, तर ५९ लाख सहा हजारांहून अधिक लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले आहेत.964 जण आणखी मरण पावले असून बळींची एकूण संख्या 1,06,490 झाली. एकूण रुग्णसंख्या 69,06,151 तर बरे झालेल्यांची संख्या 59,06,069 वर पोहोचली. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या 85.52% इतके आहे.8,93,592 रुग्णांवर देशात उपचार सुरू. ही एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 12.94% आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.54% इतका कमी आहे. ८  आॅक्टोबरला 11,68,705 चाचण्या करण्यात आल्या. 8,46,34,680 इतक्या एकूण चाचण्या झाल्या.जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ३,६८,००,२७५ झाली आहे. पहिल्या स्थानावर असलेल्या अमेरिकेत ७८,३४,००० हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतामधील कोरोना रुग्णसंख्या ही अमेरिकेतील रुग्णांपेक्षा सुमारे ११ लाखांनी कमी आहे.पद्मनाभस्वामी मंदिरातील १० पुजाऱ्यांना बाधाकेरळमधील पद्मनाभस्वामी या प्रख्यात मंदिरातील १२ पैकी १० पुजाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे हे मंदिर १५ आॅक्टोबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतरच भाविकांना ते दर्शनासाठी खुले होईल.या देवळाचे दोन्ही मुख्य पुजारी कोरोनाने आजारी आहेत. कोरोनाची बाधा झालेल्यांमध्ये या देवळाच्या दोन सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या