शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: सक्रिय रुग्णांच्या संख्येत १३८ दिवसांनंतर मोठी घट, ९१ लाख लोक कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2020 05:16 IST

coronavirus News : रविवारी कोरोनाचे ३६,०११ नवे रुग्ण आढळून आले, तर एकूण रुग्णसंख्या ९६,४४,२२२ झाली आहे. या संसर्गाने आणखी ४८२ जण मरण पावले असून बळींचा आकडा १,४०,१८२ झाला आहे.

 नवी दिल्ली : देशात कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत १३८ दिवसांनंतर मोठी घट झाली असून, आता ही संख्या  ४.०३ लाख आहे. या संसर्गातून आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी कोरोनाचे ३६,०११ नवे रुग्ण आढळून आले, तर एकूण रुग्णसंख्या ९६,४४,२२२ झाली आहे. या संसर्गाने आणखी ४८२ जण मरण पावले असून बळींचा आकडा १,४०,१८२ झाला आहे. बरे झालेल्यांची संख्या ९१,००,७९२ आहे. २१ जुलैला देशात सक्रिय रुग्णांची संख्या ४,०२,५२९ होती. त्यानंतर १३८ दिवसांनी मोठी घट होऊन सक्रिय रुग्णांची संख्या ४,०३,२४८ झाली. गेल्या सात दिवसांत देशात दर दहा लाख लोकांमागे कोरोना रुग्णांची संख्या १८९ आहे. तसेच दर दहा लाख लोकांमागे कोरोनामुळे फक्त ३ जणांचा मृत्यू झाला. जगभरात कोरोनाचे ६ कोटी ६९ लाख रुग्ण असून त्यातील ४ कोटी ६२ लाख रुग्ण बरे झाले आहेत, तर १५ लाख ३५ हजार जण मरण पावले.  अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यात दरदिवशी सरासरी १,८०००० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या साथीचा अमेरिकेभोवती पडलेला विळखा आणखी घट्ट होण्याची चिन्हे आहेत. 

फायझरने लसीच्या आपत्कालीन वापराकरिता केला भारताकडे अर्ज

फायझर-बायोएनटेक या कंपन्यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगीकरिता फायझरकडून भारताच्या औषध नियंत्रकांकडे (डीजीसीआय) अर्ज करण्यात आला आहे. मानवी चाचण्यांच्या तिसऱ्या टप्प्यात ही लस ९५ टक्के परिणामकारक असल्याचे आढळून आले, असा फायझरचा दावा आहे. फायझरने तयार केलेली लस ब्रिटन, बहारिनमधील नागरिकांना दिली जाणार आहे. 

कोरोना लसीच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीसाठी भारताच्या औषध नियंत्रकांकडे अर्ज करणारी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. भारताबाहेर केलेल्या मानवी चाचण्यांच्या निष्कर्षांमुळे औषध नियंत्रकांचे समाधान झाल्यास फायझर कंपनीला लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

 औषध नियंत्रकांकडे केलेल्या अर्जात फायझरने म्हटले आहे की, आमच्या कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या आयातीस व तिची भारतात विक्री करण्यास व वितरणास परवानगी देण्यात यावी. या लसीच्या भारतात मानवी चाचण्या झालेल्या नसल्या तरी औषधे व मानवी चाचण्यांबाबत गेल्या वर्षी बनविण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार लसीच्या आयातीस मंजुरी द्यावी. 

हा अर्ज केल्यानंतर त्यावर ९० दिवसांच्या आत औषध नियंत्रकांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारत