शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: पोलिसांच्या भीतीने रेल्वे मार्गाने ६०० किमी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 02:15 IST

बांधकाम मजुरांचे उलटे स्थलांतर; गावी जाण्यासाठी १४ दिवसांची पायपीट

रायगड (ओडिसा) : लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी मजुरांचे लोंढेच्या लोंढे आपल्या गावी जाण्यासाठी रस्त्यांवर उतरत असल्याचे आणि पायी घरी चालल्याचे वृत्त पाहिले आहे. झारखंड येथील आपल्या गावी जाण्यासाठी आंध्र प्रदेशातून तब्बल सहाशे किलोमीटर अंतर चौदा दिवसांत कापलेल्या मजुरांच्या गटाला ओडिसा पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. पोलिसांच्या भीतीने या मजुरांनी रस्त्याचा मार्ग न धरता, चक्क रेल्वे मार्गाचा वापर केल्याचे समोर आले आहे. सोबत घेतलेले बिस्कीट आणि वाटेतील गावातील लोकांनी दिलेल्या अन्नावर त्यांनी दिवस काढल्याची माहिती समोर आली आहे.लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार गेला आहे. अनेक ठिकाणी कोणतीही सोय न झाल्याने रोजंदारीवर काम करणारे मजूर आपल्या गावी जात आहेत. रेल्वे, स्थानिक बससेवा बंद असल्याने अनेक मजूर पायीच घरी जाणे पसंत करीत आहेत. मात्र, रस्त्यावर गर्दी करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून काठीचा प्रसाद मिळत आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे एका बांधकाम प्रकल्पावर असलेल्या ११ मजुरांनी रेल्वे मार्गाच्या बाजूने पायी घरी जाण्याचा निर्णय घेतला.मोबाईलवरील गुगल मॅप, रेल्वे मार्गावरील चार्जिंग पॉइंटवर मोबाईल चार्ज करीत कधी घनदाट जंगल, तर कधी डोंगर कपारी आणि रेल्वे बोगद्यातून मार्गक्रमण करीत मजुरांनी १४ दिवसांत तब्बल ६०० किलोमीटर अंतर कापले. ओडिशातील रायगड जिल्ह्यात रेल्वे स्थानकानजीक पोलिसांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांचा घराचा प्रवास अर्ध्यावर थांबला. पोलिसांनी त्यांना विलगीकरण कक्षात धाडले आहे.झारखंडमधील लामरी कालन परिसरातील चटनिया गावातील रहिवासी असलेले बांधकाम मजूर प्रमोद कुमार राम म्हणाले, की आम्ही बांधकाम कंपनीमध्ये ७ दिवस काम केल्यानंतर लॉकडाऊन घोषित झाला. आम्ही ठेकेदाराकडे पैसे मागितल्यावर तो पळून गेला. कंपनीने आमची कोणतीही सोय केली नाही. काही दिवस आम्ही काढले.मात्र, रोजगारच नसल्याने जवळचे पैसेही संपू लागले. अखेर आम्ही घरी जायचा निर्णय घेतला. रस्त्याने गेल्यास पोलिसांचा मार बसेल म्हणून आम्ही रेल्वे मार्गाने जायचा निर्णय घेतला. मोबाईल ट्रॅकिंग सिस्टिीमचा वापर केला. तसेच, रेल्वेने आंध्र प्रदेशात या पूर्वी प्रवास झाला असल्याने रेल्वेमार्ग परिसरातील काही स्टेशन आणि भाग परिचयाचा होता. त्यामुळे अडचण आली नाही.दररोज दुपारी चार वाजल्यापासून रात्री उशिरा पर्यंत चालून, दररोज सरासरी चाळीस किलोमीटरहून अधिक अंतर पार केले. प्रत्येकाच्या जवळ दोनशे ते तीनशे रुपये होते. त्यातून बिस्कीटचे पुडे खरेदी केले. मार्गात लागणाºया गावातील नागरिकांनीही अन्न दिले. त्यावर गुजराण केली.-सुनील चौधरी, रा. मांझी गाव,जि. गढवा, झारखंड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या