शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: देशात भारी! 'या' राज्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 06:57 IST

देशापुढे ठेवला आदर्श; राज्यात साथ आटोक्यात येण्याची चिन्हे

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये उपचार सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांपेक्षा या साथीतून बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे. सारा देश ‘कोविड-१९’नामक भयंकर महामारीचा मुकाबला करत असताना, साथ नियंत्रणात कशी आणावी याचा आदर्श केरळने घालून दिला आहे. या राज्यात १४० रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या २५७ झाली आहे.केरळमध्ये शनिवारपर्यंत कोरोना विषाणूमुळे संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३९९ झाली असून, त्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या सर्वाधिक असून, त्यानंतर तमिळनाडू व केरळ या राज्यांचा क्रमांक लागतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये रुग्णांची एकूण संख्या ३ हजारांपेक्षा जास्त तर तमिळनाडूमध्ये १ हजारपेक्षा जास्त इतकी आहे. केरळमध्ये मात्र बाधितांची संख्या या दोन राज्यांपेक्षा कमी आहे. कोरोना विषाणूच्या एकूण रुग्णसंख्येबाबत केरळ देशामध्ये १४व्या क्रमांकावर आहे. (वृत्तसंस्था)मृत्यूदर अवघा ०.५ टक्केकेरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, आमच्या राज्यात कोरोना विषाणूच्या साथीमुळे मृत्यूदर ०.५ टक्के असून जगामध्ये हेच प्रमाण ५ टक्के इतके आहे. काही ठिकाणी हाच मृत्यूदर १० टक्क्यांहून अधिक आहे. रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्षात ठेवलेल्या कोरोना रुग्णांपैकी बहुतांश लोकांची प्रकृती स्थिर आहे. फक्त काही रुग्णांचीच प्रकृती चिंताजनक आहे.केरळमध्ये आजारातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. असे असले तरी लॉकडाऊन शिथिल अथवा मागे घेण्याइतपत परिस्थितीत सुधारणा झालेली नाही.- पिनाराई विजयन, मुख्यमंत्री, केरळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याKeralaकेरळ