शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
6
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
7
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
8
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
9
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
10
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
11
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
12
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
13
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
14
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
15
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
16
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
17
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
18
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
19
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
20
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना

Coronavirus : कोरोना विषाणूंच्या संसर्गशक्तीत जूनअखेरपासून झाली वाढ, आरोग्यस्थिती अधिक बिकट होण्याची तज्ज्ञांना भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 09:56 IST

अभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

ठळक मुद्देअभ्यासातील निष्कर्ष; आरोग्यस्थिती आणखी बिघडण्याची भीती

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीमध्ये (आर नंबर) जूनच्या अखेरीपासून मोठी वाढ झाली असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले. या साथीच्या दुसऱ्या लाटेने कळस गाठल्यानंतरची ही घटना आहे. त्यापायी कोरोना साथीमुळे आरोग्यस्थिती आणखी बिकट होण्याची भीती वैद्यकीय तज्ज्ञांना वाटत आहे.

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रमाणात जूनमध्ये घट झाली होती. मात्र २० जून ते ७ जुलै या कालावधीत संसर्गामध्ये पुन्हा वाढ होत असल्याचे निदर्शनास आले. याच कालावधीत देशात विविध तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांवर हजारो पर्यटकांनी गर्दी केली होती. त्यातूनही कोरोनाचा प्रसार वाढला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

१५ मे ते २६ जून या कालावधीत संसर्गाची पातळी ०.७८ ते ०.८८च्या दरम्यान होती. चेन्नई येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसमधील शास्त्रज्ञ सीताभ्रा सिन्हा यांनी गणिती प्रारूपांच्या मदतीने या स्थितीचे विश्लेषण केले.त्यांनी सांगितले की, सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होण्याचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये मंदावला आहे. १०० कोरोना रुग्णांच्या एका गटामुळे आता ८८ लोकांना या आजाराचा संसर्ग होतो. पूर्वी हेच प्रमाण ७८ होते. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येवरून कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीबद्दल निष्कर्ष काढता येतो. विषाणूंमध्ये संसर्गशक्ती कमी असल्यास साथ मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. 

महाराष्ट्र, केरळमध्ये जास्त प्रमाणमहाराष्ट्र, केरळ वगळता अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गशक्तीचे प्रमाण एकपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्र, केरळमध्ये हे प्रमाण अनुक्रमे १.१ व १ असे प्रमाण आहे. केंद्राने कोरोना साथीसंदर्भात नेमलेल्या कृती दलाचे प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले होते की, कोरोना रुग्णांची संख्या सर्वात कमी होण्याच्या पातळीपासून आपला देश अद्याप खूप दूर आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसKeralaकेरळNIti Ayogनिती आयोग