शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

Coronavirus: "अन्य देशांपेक्षा भारताची स्थिती आटोक्यात; वेळेत उपाय योजल्याने झाले शक्य"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 08:23 IST

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.

नवी दिल्ली : कोरोनावर नियंत्रण आणण्यात भारताला अपयश येईल, असे सर्वांना वाटत होते. पण लॉकडाऊन, निर्बंध आणि जनतेला विश्वासात घेऊन सरकारने उचललेली पावले यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले.

केरळमधील रेव्हरंड जोसेफ मार थोमा यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शुभेच्छा दिल्या. मोदी म्हणाले, कोरोना हा केवळ शारीरिक आजार नसून, हे मोठे संकट आहे आणि सारे जग कोरोनाशी झुंज देत आहे. या लढ्यासाठी प्रत्येक भारतीयाला आपली जीवनशैली बदलावी लागेल. चुकीच्या सवयी सोडाव्या लागतील.

कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहेत, जनतेच्या सहभागामुळे हा लढा शक्य झाला आहे. यापुढेही मास्कचा वापर करीत अधिक काळजी घेत सतर्क राहावे लागेल, असे मोदी यांनी सांगितले.राहुल यांची टीकादेशात कोरोनाबाधितांची संख्या ५ लाखांवर गेली आहे. देशाच्या प्रत्येक भागात रुग्ण आढळत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याकडे कोरोनाविरुद्धच्या लढ्याची उपाययोजना नसल्यानेच हे घडत आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली. रुग्ण वाढत असले तरी मंत्रिगट वा आयसीएमआरची बैठक झालेली नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषद घेण्याऐवजी निवेदन जारी करणे सुरू केले आहे. पंतप्रधानांसह सारेच प्रश्नांची उत्तर देणे टाळत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी