शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

CoronaVirus News: मे महिन्यात देशाची निर्यात घटली; व्यापार तूट झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 01:22 IST

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे देशाच्या आयात-निर्यात व्यापाराबाबतची आकडेवारी जाहीर

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटामुळे विविध देशांमधील कमी झालेल्या मागणीमुळे मे महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये ३६.४७ टक्के अशी मोठी घट झाली आहे. निर्यातीमध्ये घट होणारा हा सलग तिसरा महिना आहे. त्याचप्रमाणे देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तूट यामुळे कमी झाली आहे.वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातर्फे सोमवारी देशाच्या आयात-निर्यात व्यापाराबाबतची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामधून वरील बाब स्पष्ट झाली आहे. मे महिन्यात देशाच्या निर्यातीमध्ये ३६.४७ टक्के एवढी घट होऊन १९.०५ अब्ज डॉलरच्या वस्तू विविध देशांकडे पाठविण्यात आल्या. त्याचबरोबर या काळामध्ये देशाच्या आयातीतही ५१ टक्के अशी मोठी घट झाली आहे. मे महिन्यात २२.२ अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात करण्यात आली. या महिन्यामध्ये देशाच्या आयात-निर्यात व्यापारातील तोटा कमी होऊन तो ३.१५ अब्ज डॉलरवर आला आहे. मागील वर्षी याच महिन्यात हा तोटा १५.३६ अब्ज डॉलर इतका होता.मे महिन्यात देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूंपैकी तांदूळ, मसाल्याचे पदार्थ, लोह खनिज आणि औषधे यांचा अपवाद वगळता अन्य २६ प्रमुख वस्तूंमध्ये घट झालेली आहे. दागिने आणि रत्नांच्या निर्यातीमध्ये ६८.८३ टक्के, चामड्याच्या वस्तूंमध्ये ७५ टक्के, पेट्रोलियम उत्पादनांमध्ये ६८.४६ टक्के, इंजिनिअरिंग उत्पादनांमध्ये २४.२५ टक्के तर तयार कपड्यांच्या निर्यातीमध्ये ६६.१९ टक्के एवढी घट झाली आहे. विविध देशांमधील लॉकडाऊनचा हा परिणाम होता.खनिज तेल, सोन्याच्या आयातीमध्ये घटमे महिन्यात देशात होत असलेल्या खनिज तेलाच्या आयातीत ७१.९८ टक्के घट झाली असून, त्यासाठी ३.४९ अब्ज डॉलर खर्च झाले आहेत. मागील वर्षाच्या याच महिन्यात खनिज तेलाच्या आयातीवर १२.४४ अब्ज डॉलर खर्च झाले होते. याशिवाय खनिज तेलवगळता अन्य उत्पादनांची आयात ४३.१३ टक्क्यांनी घटली आहे. सोने, चांदी, वाहने, कोळसा, खते, यंत्रसामग्री यांच्यासह एकूण २८ वस्तूंची आयात कमी झाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यात सोन्याच्या आयातीमध्ये ९८.४ टक्के एवढी प्रचंड घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या