शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
3
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
4
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
5
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
6
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
7
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
8
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
9
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
10
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
11
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
12
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
13
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
14
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
15
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
16
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
17
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
18
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
19
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
20
Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानसेवांच्या प्रतिष्ठेवरही गंभीर परिणाम!

Coronavirus: कोरोनावरील भारतीय बनावटीच्या लसीची होणार माणसांवर चाचणी; केंद्र सरकारची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 03:36 IST

कोव्हाक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय), सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत असताना, आजारावरील स्वदेशी बनावटीच्या पहिल्यावहिल्या प्रतिबंधक लसीच्या माणसांवर चाचण्या करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही)च्या सहकार्याने भारत बायोटेकने कोव्हाक्सिन ही लस बनविली आहे.

काही भारतीय कंपन्यांनी या आजारावरील प्रतिबंधक लस बनविण्यासाठी प्रयोग सुरू केले. असेच प्रयत्न अमेरिकेसह इतर काही देशांतही सुरू आहेत. भारत बायोटेक या कंपनीने हैदराबाद येथील जिनोम व्हॅली येथे तिच्या प्रकल्पामध्ये कोव्हाक्सिन ही प्रतिबंधक लस तयार केली आहे.

कोव्हाक्सिन लसीच्या माणसांवर चाचण्या करण्यास ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय), सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) तसेच केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. त्यानुसार कोव्हाक्सिनच्या माणसांवर पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या जुलै महिन्यात सुरू होतील. या लसीच्या प्राण्यांवर केल्या गेलेल्या प्रयोगांचे निष्कर्ष भारत बायोटेक कंपनीने केंद्र सरकारला सादर केले होते. त्याचा अभ्यास करून केंद्र सरकारने ही परवानगी दिली आहे.आॅक्सफर्ड प्रयोग जगात अव्वलअनेक देशांत कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्याबाबत आॅक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेन्सा यांच्या वतीने सुरू असलेले प्रयोग जगात अव्वलस्थानी आहेत असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीने कोरोना लस बनविण्यासाठी केलेल्या प्रयोगांचा क्रमांक लागतो. आॅक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेनेन्सा बनवीत असलेल्या लसीचा माणसांवरील चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण केला. मॉडर्ना कंपनीच्या लसीचा माणसांवरील चाचणीचा तिसरा टप्पा लवकरच सुरू होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या