शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

Coronavirus: भारतात लवकरच दररोज एक लाख कोरोना टेस्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 00:37 IST

आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, भारत लवकरच जगातील त्या पाच देशांच्या रांगेत जाऊन बसेल जे देश दररोज एक लाख टेस्ट करतात.

नवी दिल्ली : भारतात लवकरच दररोज एक लाख कोरोना टेस्ट होणार आहेत. देशात शनिवारी टेस्टची संख्या दुप्पट म्हणजे ७३,७०९ करण्यात आली आहे. देशाची टेस्टची क्षमता ५० हजार टेस्ट होती. आता ती दररोज एक लाख इतकी होणार आहे.देशातील ३०४ सरकारी आणि १०५ खासगी लॅबच्या माध्यमातून १० लाख टेस्टचा टप्पा गाठण्यात आला आहे. गुजरातमध्ये सध्या तपासाचा वेग दहा लाख लोकांमागे ११४० इतकाच आहे. तर, महाराष्ट्रात हा दर दहा लाखांमागे १३६३ आहे. या यादीत दिल्ली वरच्या क्रमांकावर आहे. येथे दहा लाखांमागे २३७० टेस्ट होत आहेत.

आरोग्य मंत्रालयातील सूत्रांचे असे म्हणणे आहे की, भारत लवकरच जगातील त्या पाच देशांच्या रांगेत जाऊन बसेल जे देश दररोज एक लाख टेस्ट करतात. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, आगामी दहा दिवसात टेस्ट वाढविण्यासाठी संबंधित उत्पादन वाढविण्यात येत आहे. या टेस्ट आरटी- पीसीआर कीटच्या माध्यमातून केल्या जात आहेत. आयसीएमआर याला ‘गोल्डन टेस्ट’ म्हणते. कारण, या टेस्ट १०० टक्के अचूक असतात.ऑरेंज झोनमध्ये जिल्ह्यांतर्गत प्रवासाला मिळाली परवानगी1 नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊन वाढवल्यानंतर ऑरेंज झोनसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने सुधारित मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे. ऑरेंज झोनमध्ये आंतरजिल्हा प्रवासासाठी खासगी चारचाकी व दुचाकी वापरता येईल. मात्र, स्थानिक प्रशासनाने ठरवलेल्या कामांसाठीच हा प्रवास करता येईल.2 ऑरेंज झोनमध्ये कॅब, ओला, उबरसाठीदेखील हा नियम लागू असेल. मात्र, चारचाकीत चालकासह दोन, तर दुचाकीवरून केवळ एकच व्यक्ती प्रवास करू शकेल.3 आंतरजिल्हा प्रवासामुळे दोन तालुक्यांमधील अर्थकारणास गती येईल. मात्र, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क लावण्यास पर्याय नसेल. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद असून, स्पष्ट निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. आॅरेंज झोनसाठी मार्गदर्शिकेतील स्पष्टीकरण माहिती व प्रसार मंत्रालयाने शनिवारी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या