शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: खनिज तेलाच्या घटलेल्या दरांचा भारत फायदा घेणार; तेलाचा साठा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 07:05 IST

तीन देशांकडून खरेदी; भूमिगत गोदामात साठवण

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कमी झालेल्या खनिज तेलाच्या किमतीचा लाभ उठविण्यासाठी भारत आपल्याकडील भूमिगत गोदामांमध्ये खनिज तेलाचा साठा करून ठेवणार आहे. आणीबाणीच्या काळात देशाला ९.५ दिवस पुरेल इतका साठा या गोदामांमध्ये करता येऊ शकतो. यासाठी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इराककडून तेलाची खरेदी केली जाणार आहे.सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात भूमिगत तेल गोदामे तयार केली आहेत. मंगळुरू येथील गोदामाची क्षमता १५ लाख टनाची आहे. यापैकी निम्मी क्षमता अबुधाबीच्या नॅशनल ऑइल कंपनीने खरेदी केली आहे. ही कंपनी येथे ७.५ लाख टन तेलाची साठवणूक करते. येथील ७.५ लाख टनाचा साठा अद्याप रिक्त असून, तो संयुक्त अरब अमिरातीकडून तेल खरेदी करून भरला जाणार आहे.कर्नाटकातीलच पादूर येथे असलेल्या गोदामाची क्षमता सर्वाधिक म्हणजे २५ लाख टनांची आहे. यामधील निम्मी जागा अबुधाबीच्या नॅशनल आॅइल कंपनीने खरेदी केली आहे, मात्र कधीही वापर केलेला नाही. येथील निम्मे क्षेत्र रिक्त असून, तेथे तेल साठविले जाणार आहे. विशाखापट्टणम् येथील गोदामामध्ये फारशी जागा शिल्लक नाही. मात्र जी जागा शिल्लक आहे, ती भरण्यासाठी इराककडून तेलाची खरेदी करण्याची तयारी सुरू आहे.ग्राहकांना मात्र फायदा नाहीलॉकडाऊनमुळे देशातील वाहतूक जवळपास बंद झाली आहे. त्यामुळे इंधनाच्या खपात मोठी कपात घाली आहे. दररोज इंधन कंपन्यांचे जाहीर होणारे विक्री दर आता बंद आहेत. त्यामुळे कमी झालेल्या किमतीचा लाभ ग्राहकांना मिळत नाही. पेट्रोलपंपांवरील उलाढाल खूपच कमी झाल्याने दैनंदिन खर्च कसा भागवावा, असा प्रश्न पंपचालकांपुढे आहे.

टॅग्स :Crude Oilखनिज तेल