शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

CoronaVirus News: देशातील कोरोनाची लाट ओसरतेय?; बघा, आकडेवारी काय सांगतेय

By कुणाल गवाणकर | Updated: September 23, 2020 14:58 IST

CoronaVirus News: भारतासाठी पॉझिटिव्ह आकडेवारी; कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांची संख्या ५६ लाखांच्या पुढे गेली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार १६ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८५९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. एका दिवसातला हा सर्वोच्च आकडा होता. मात्र त्यानंतर हा आकडा खाली येऊ लागला आहे. वर्ल्डोमीटरच्या संकेतस्थळावरील आकडेवारी पाहता गेल्या सात दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाची लाट ओसरली का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.'कोणतीही कोरोना लस यशस्वी ठरण्याची गॅरेंटी नाही'; WHO च्या प्रमुखांचे धक्कादायक विधान१६ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८५९ कोरोना रुग्ण आढळले. १७ सप्टेंबरला ९६ हजार ७९३ रुग्णांची नोंद झाली. १८ सप्टेंबरला ९२ हजार ७८९, १९ सप्टेंबरला ९२ हजार ७५५, २० सप्टेंबरला ८७ हजार ३८२, २१ सप्टेंबरला ७४ हजार ४९३, २२ सप्टेंबरला ८० हजार ३९१ आणि २३ सप्टेंबरला ८३ हजार ३४७ रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे १६ सप्टेंबरनंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होताना दिसत आहे. "चीनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना, प्रकरण दाबण्यात WHO चा हात", वैज्ञानिकाचा आरोपएका बाजूला नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत भारतानं अमेरिकाला मागे टाकलं आहे. देशातील ४५ लाख ८७ हजार ६१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ४३ लाख ४६ हजार ११० इतकी आहे. भारीच! सिरम इन्स्टिट्यूटने बनवली CDX-005 नेझल स्प्रे कोरोना लस; उत्पादनाला सुरूवातदेशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना दररोज होणाऱ्या चाचण्यांची संख्या वाढत आहे. सध्या देशात दररोज १२ लाख कोरोना चाचण्या होत असल्याची माहिती आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. 'देशाची कोरोना चाचण्यांची क्षमता प्रतिदिन १२ लाखांवर गेली आहे. आतापर्यंत देशात ६.५ कोटी चाचण्या झाल्या आहेत. चाचण्यांची संख्या वाढल्यानं कोरोना रुग्ण लवकर आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार करणं शक्य झालं आहे,' असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या