शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मोठ्ठा दिलासा! देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या घसरली; बरे होणाऱ्यांची वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 10:04 IST

Corona Virus in India: सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता.

देशात दररोज सापडणाऱ्या कोरोनाबाधितांच्या (Corona patient) संख्येत आज मोठी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून साडे तीन लाखांवर हे रुग्ण सापडू लागले होते. मात्र, आजच्या आकड्याच तब्बल 29,847 घसरण झाल्याने दुसऱ्या लाटेत सापडलेल्या देशवासियांसाठी एक मोठा दिलासा ठरला आहे. (India reports 3,23,144 new #COVID19 cases, 2771 deaths and 2,51,827 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry)

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमध्ये 3,52,991 नवे रुग्ण आढळले होते. तर कोरोनामुळे 2812 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांचा आकडा आजवरचा सर्वाधिक आकडा होता. तसेच 2,19,272 रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, आज जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये थेट 29,847 रुग्णांची घसरण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन लावण्यात आला आहे. यामुळे हळू हळू ही घरसण पहायला मिळण्याची शक्यता आहे. 

गेल्या 24 तासांत देशात 3,23,144 नवे रुग्ण सापडले आहेत. तर मृतांचा आकडाही काहीसा घसरून 2771 झाला आहे. आणखी एक दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही 32,555 ने वाढले आहे. दिवसभरात 2,51,827 रुग्ण बरे झाले आहेत. देशात आजवर 1,76,36,307 कोरोनाबाधित सापडले. त्यापैकी 1,45,56,209 बरे झाले आहेत. तर 1,97,894 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 28,82,204  रुग्ण उपचार घेत असून 14,52,71,186 लसीकरण झाले आहे. 

१८ ते २५ एप्रिलमध्ये देशात २२ लाख नवे रुग्ण

देशात १८ ते २५ एप्रिल या काळात २२ लाख ४९ हजार नवे रुग्ण वाढले तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या २८ लाखांहून अधिक झाली. तसेच या कालावधीत कोरोनामुळे १६ हजार जणांचा बळी गेला आहे. या आठवड्यात देशात इतके रुग्ण वाढले की तो विश्वविक्रमच झाला. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर मात्र अद्यापही १.१३ टक्के इतका कमी राखण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले. बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८२.६ टक्के आहे.

भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून जे शक्य आहे, ते सर्व केले जात आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, असे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. तसेच, हजारहून अधिक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाईल फील्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा पुरवठा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या