शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

CoronaVirus News: कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या घरात; पण 'त्या' आकड्यानं देशाला मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 22:42 IST

CoronaVirus News: प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती चांगली

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. गेल्या ६४ दिवसांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १०० वरुन १ लाखांवर पोहोचली आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यूदर अतिशय कमी आहे. देशात दर एक लाख लोकसंख्येमागील मृत्यूदर ०.२ असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. जगाची सरासरी काढल्यास हाच आकडा ४.१ इतका आहे. देशात आतापर्यंत १ लाख १ हजार १३९ जणांचा कोरोनाची लागण झाली असून मृतांचा आकडा ३ हजार १६३ इतका आहे.सोमवारी (काल) देशात १ लाख ८ हजार २३३ कोरोना चाचण्या झाल्या. देशात आतापर्यंत २४ लाख २५ हजार ७४२ चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. मंगळवारपर्यंत जगभरात कोरोनामुळे ३ लाख ११ हजार ८४७ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आरोग्य मंत्रालयानं जागतिक आरोग्य संघटनेच्या हवाल्यानं दिली. जगभरातला मृत्यूदर एक लाख लोकसंख्यामागे ४.१ टक्के असल्याचं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.अमेरिकेत कोरोनामुळे सर्वाधिक ८७ हजार १८० जणांचा मृत्यू झाला. अमेरिकेत दर एक लाख व्यक्तींमागे मृत्यूदर २६.६ इतका आहे. ब्रिटनमध्ये मृतांचा आकडा ३४ हजार ६३६ इतका आहे. ब्रिटनमध्ये दर एक लाख व्यक्तींमागे मृत्यूदर ५२.१ आहे. इटलीमध्ये ३१ हजार ९०८ जणांनी जीव गमावला असून मृत्यूदर ५२.८ इतका आहे. फ्रान्समध्ये कोरोनामुळे २८ हजार ५९ जणांचे प्राण गेले असून मृत्यूदर प्रति लाख व्यक्तींमागे ४१.९ इतका आहे. स्पेन, जर्मनी, इराण, कॅनडा, नेदरलँड, मेक्सिकोमध्ये मृत्यूदर अनुक्रमे ५९.२, ९.६, ८.५, १५.४, ३३.० आणि ४.० इतका आहे. तर चीनमधला मृत्यूदर ०.३ इतका आहे. १ जूनपासून दररोज २०० विशेष गाड्या धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून मोठी घोषणा काँग्रेसच्या १००० बसेसवरुन वाद; प्रियंका गांधींच्या सचिवासह प्रदेश अध्यक्षाविरोधात एफआयआरअखेर काश्मिरी पंडितांना पुनर्वसनाची चाहूल; मोदी सरकारनं उचललं महत्त्वाचं पाऊल

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या