शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Coronavirus : मुस्लिमांसाठी भारत स्वर्ग, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित; मोदी कॅबिनेटमधील मंत्र्यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 14:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत.

ठळक मुद्देकोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत.

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं देशात धुमाकूळ घातला आहे. कोरोनामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारेही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तबलिगी जमातचं प्रकरण असो किंवा पालघरच्या साधूंच्या हत्येचा प्रकार यांना काही जणांकडून जातीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारमधले मंत्री असलेल्या मुख्तार अब्बास नक्वी यावर भाष्य केलं आहे. भारत हा मुस्लिमांसाठी स्वर्ग असून, इथे त्यांचे अधिकार सुरक्षित असल्याचं ते म्हणाले आहेत. इस्लामिक देशांच्या गटाच्या टिपण्णीवर प्रतिक्रिया देताना नक्वी म्हणाले की, "धर्मनिरपेक्षता आणि सौहार्द" ही "राजकीय फॅशन" नसून भारत आणि भारतीयांसाठी "परिपूर्ण पॅशन" आहे. या सर्वसमावेशक संस्कृती आणि दृढ वचनबद्धतेमुळेच जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाला विविधतेतील एकतेच्या धाग्यात बांधला आले आहे. अल्पसंख्याकांसह देशातील सर्व नागरिकांचे घटनात्मक, सामाजिक, धार्मिक हक्क ही भारताची घटनात्मक व नैतिक हमी आहेत. कोणत्याही परिस्थितीत आपल्या "विविधतेतील एकता" चे सामर्थ्य कमकुवत होऊ शकत नाही.आपण दक्षतापूर्वक एकत्रित होऊन समाजात दुही माजवणाऱ्या अशा शक्तींच्या प्रचाराला पराभूत केले पाहिजे. फेक न्यूज पसरवणारे, चिथावणी देणाऱ्यांपासून सावध राहिलं पाहिजे. या प्रकारची षड्यंत्र रचणे आणि कोरोनाविरुद्ध देशातील सामूहिक युद्ध दुर्बल होऊ देता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अखंड राष्ट्र, धर्म, प्रदेश आणि जातीच्या पार जाऊन कोरोनाच्या साथीशी एकजुटीनं लढा देत आहोत. केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की, देशातील सर्व मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था आणि भारतीय मुस्लिम समाज यांनी २४ एप्रिलपासून रमजानच्या पवित्र महिन्यात घरी राहून एकत्रितपणे प्रार्थना, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील ३०हून अधिक राज्य वक्फ बोर्डांच्या लोकांनी पवित्र रमजान महिन्यात धार्मिक, सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी लॉकडाऊन, कर्फ्यू, सामाजिक अंतर प्रभावीपणे पाळण्यासाठी आणि लोकांना स्वतःहून प्रार्थना जागरूक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. राज्य वक्फ बोर्डाने मुस्लिम धार्मिक नेते, इमाम, धार्मिक-सामाजिक संस्था, मुस्लिम समाज आणि स्थानिक प्रशासनासह काम करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात एकजुटीने लढा देत आहे. जगातील बहुतेक मुस्लिम राष्ट्रांनीही रमजानमधील मशिदी आणि इतर धार्मिक स्थळांवर असलेल्या गर्दीच्या कार्यांवर बंदी घातली आहे आणि घरी नमाज, इफ्तार आणि इतर धार्मिक कर्तव्ये पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचाही उल्लेख नक्वी यांनी केला आहे.  

Coronavirus : Reliance Jioचा जबरदस्त प्लॅन; 350 जीबी डेटासह बरंच काही

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या