शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: रशियाच्या लसीला तिसऱ्या टप्प्याचे प्रयोग करण्यास प्रतिबंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2020 01:22 IST

CoronaVirus vaccine news: दुसऱ्या टप्प्याचे प्रयोग अपरिहार्य

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : स्पुटनिक व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांच्या थेट तिसºया टप्प्याचे प्रयोग भारतात करण्याची अनुमती रशियाने मागितली होती; पण अशी परवानगी देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. या लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा आधी पार पाडा व मग पुढच्या टप्प्याकडे वळा असे रशियाला सांगण्यात आले आहे.स्पुटनिक व्ही ही औषध नियंत्रकांची मान्यता मिळालेली जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस आहे. या लसीवर रशियात मोठ्या प्रमाणावर प्रयोग केलेले असल्याने तिच्या मानवी चाचण्यांचा थेट तिसरा टप्पा भारतात पार पाडण्यास परवानगी द्यावी असा अर्ज रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी केंद्र सरकारकडे केला होता. त्यावर सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल आॅर्गनायेझशन (सीडीएससीओ) या केंद्र सरकारच्या संस्थेतील तज्ज्ञगटाने विचारविनीमय केला.रशियाला स्पुटनिक-व्ही लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा आधी पार पाडावाच लागेल असे मत या तज्ज्ञगटाने व्यक्त केले. या लसीच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा वगळण्याची सवलत रशियाला केंद्र सरकारने दिली आहे. त्यामुळे आता आरडीआयएफ व डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला स्पुटनिक व्ही लसीच्या मानवी चाचण्यांचा दुसरा टप्पा पार पाडण्यासाठी केंद्र सरकारकडे नवा अर्ज करावा लागणार आहे.स्पुटनिक व्ही या लसीच्या भारतात मानवी चाचण्या तसेच वितरणासाठी रशियाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज या भारतीय कंपनीशी करार केला आहे. भारताने या लसीच्या मानवी चाचण्यांना परवानगी दिली तर आरडीआयएफने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला कोरोना प्रतिबंधक लसीचे १० कोटी डोस पुरविण्याची तयारी ठेवली आहे.सात लसींच्या चाचण्यांकडे लक्ष26 कोरोना प्रतिबंधक लसींच्या जगभरात चाचण्या सुरू आहेत. त्यातील सात लसींच्या चाचण्या पुढच्या टप्प्यात आहेत. त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.त्यामध्ये भारत-बायोटेक-आयसीएमआर तयार करत असलेली कोव्हॅक्सिन लस, झायडस कॅडिला बनवत असलेली लस यांचा समावेश आहे.नोव्हॅव्हॅक्सनेही कोरोना प्रतिबंधक लसीच्या उत्पादनासाठी सिरम इन्स्टिट्यूटशी करार केला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या