शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा वाढता विळखा! देशातील रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2020 21:28 IST

CoronaVirus News: गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत आहे. देशात सध्याच्या घडीला दर दिवशी ३० हजारांहून जास्त रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. एका बाजूला कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला रुग्ण बरे होण्याचं प्रमाणदेखील वाढत आहे. देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. आता देशात दररोज ३० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. काल दिवसभरात देशात ३२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले. Covid19india.org या संकेतस्थळानुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर जाऊन पोहोचलं आहे.आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना बाधितांची संख्या ९ लाख ६८ हजार ८७६ इतकी होती. तर कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा २४ हजार ९१५ इतका होता. आतापर्यंत ६ लाख १२ हजार ८१५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र दिवस संपता संपता देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा १० लाखांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून उद्या सकाळी याबद्दलची माहिती दिली जाईल.आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ६३.२५ टक्क्यांवर गेलं आहे. बहुतांश कोरोना रुग्णांमध्ये अतिशय सौम्य लक्षणं आढळून येतात. त्यातल्या केवळ ०.३२ टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची, तर ३ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता लागते, अशी माहिती हर्षवर्धन यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या