शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: स्थलांतरित मजूर, विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी वाढता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 06:52 IST

अनेक राज्यांची खास व्यवस्था करण्याची तयारी

नवी दिल्ली : राजस्थानात कोटा येथील स्पर्धा परीक्षांच्या कोचिंग क्लासेसमध्ये शिकणाऱ्या व ‘लॉकडाऊन’मुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना खास बसेसची व्यवस्था करून उत्तर प्रदेश व उत्तराखंड या राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांत परत नेल्यानंतर इतरही राज्यांवर परराज्यांमध्ये अडकलेले विद्यार्थी व स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी वाढता दबाव येत आहे. अनेक राज्यांनी त्यासाठी खास व्यवस्था करण्याची तयारी दाखविली असून, केंद्राने त्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती केली आहे.उत्तर प्रदेश व उत्तराखंडनंतर आता मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, प. बंगाल, आसाम व झारखंड ही राज्येही राजस्थानमध्ये अडकलेल्या आपापल्या विद्यार्थ्यांना घरी परत नेण्याची व्यवस्था करण्याच्या तयारीला लागली आहेत.राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून अन्य राज्यांमध्ये अडकून पडलेल्या त्यांच्या राज्यातील लोकांची अडचण सोडविण्याची त्यांना गळ घातली. अनेक राज्यांनी हा विषय मांडला असून, लवकरच यावर निर्णय घेऊ, असे शहा यांनी सांगितल्याचे गेहलोत म्हणाले.गेहलोत असेही म्हणाले की, ऐनवेळी ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्याआधी केंद्र सरकारने उद्योगधंद्यानिमित्त असे घराबाबेर फिरणाºया लोकांना घरी परत जाण्यासाठी चार-पाच दिवसांचा वेळ द्यायला हवा होता. भारत सरकार अन्य देशांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांना विशेष विमाने पाठवून परत आणते व अन्य देशांनाही भारतात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांना विशेष विमाने करून मायदेशी परत नेऊ देते, तर सरकारने राज्यांनाही तशी परवानगी द्यायला हवी.झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही अशीच भावना बोलून दाखविली. ते म्हणाले की, परराज्यांमध्ये अडकलेल्या माझ्या राज्यातील लोकांना परत आणण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा आग्रह मी केंद्राकडे धरणार आहे. हिमाचल प्रदेश व मध्यप्रदेश सरकारांकडेही नागरिकांकडून अशीच मागणी सातत्याने केली जात आहे, असे त्या राज्यांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.राजस्थानातील ५ लाख स्थलांतरित लोक अडकलेराजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले की, कामधंद्यानिमित्त गेलेले राजस्थानमधील सुमारे पाच लाख स्थलांतरित कामगार, छोटे दुकानदार व व्यापारी व खासगी नोकरदार आसाम, प. बंगाल, ईशान्येकडील अन्य राज्ये, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, केरळ व महाराष्ट्रासह अन्य राज्यांत अडकून पडले आहेत.महिनाभर घराबाहेर राहिल्याने ते हताश झाले असून, घरी परतण्यास आतुर झाले आहेत. ‘लॉकडाऊन’ उठल्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने कामधंद्याला लागण्यापूर्वी आधी त्यांना आपापल्या घरी जाऊन मानसिक शांतता मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या