शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

CoronaVirus In India: चीनसह जगभरात कोरोनाचा पुन्हा विस्फोट, भारतातही एन्ट्री; डॉ. रवी गोडसे यांनीही स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 16:47 IST

CoronaVirus In India: जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे.

नवी दिल्ली: चीन, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घालायला सुरुवात केली. येथे कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरचाही तुटवडा भासू लागला आहे. Omicron चा sub-variant BF.7 ने चीनमध्ये कहर केला आहे. भारतातही या व्हेरिअंटची लागण झालेले ४ रुग्ण आढळले आहेत. यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत नरेंद्र मोदी काय निर्णय घेणार, याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

चीन, जपानसह भारतातही कोरोनानं डोकं वर काढलं; नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक, हालचाली वाढल्या!

गेल्या २४ तासांत सापडलेल्या १८५ रुग्णांमुळे भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ कोटी, ४६ लाख, ७६ हजार ५१५ एवढी झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ४०२ एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गुरुवारी सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख ३० हजार ६८१ वर पोहोचली आहे. मात्र भारतीयांनी घाबरण्याचं काही कारण नसल्याचं डॉ. रवी गोडसे यांनी स्पष्ट केलं आहे.

जग पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. चीनमध्ये कोरोनाचा विस्फोट झाला आहे. याशिवाय जपान, अमेरिका, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगासह भारतातही नागरिकांवर भीतीचं सावट आहे. मात्र कोरोनाच्या जगभरातील वाढत्या उद्रेकामुळे भारतीयांना घाबरण्याचं काही कारण नाही, असं डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. भारतात चीनप्रमाणे कोरोनाचा उद्रेक होणार नाही, असं मत रवी गोडसे यांनी व्यक्त केलं आहे. 

दरम्यान, भारतातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत सध्याच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ०.०१ टक्के आहे. गेल्या २४ तासंमध्ये उपचाराधीन रुग्णांची सहाने कमी झाली आहे. या आकडेवारीनुसार भारतामध्ये बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांची टक्केवारी ही ९८.८० एवढी आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी, ४१ लाख, ४२ हजार ४३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची टक्केवारी ही १.१९ टक्के आहे.

२२०.०३ कोटी डोस-

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतात लसीकरण अभियानामधून आतापर्यंत कोविड-१९ प्रतिबंधक लसीचे २२०.०३ कोटी डोस देण्यात आले आहेत. भारतात १९ डिसेंबर २०२० रोजी कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर पोहोचली आहे. तर ४ मे २०२१ रोजी ही रुग्णसंख्या दोन कोटींवर पोहोचली होती. २३ जून २०२१ रोजी या रुग्णसंख्येने ३ कोटींचा आकडा ओलांडला होता. तर २५ जानेवारी २०२२ रोजी भारतातील कोरोना रुग्णांची संख्या ही चार कोटींवर पोहोचली होती.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतchinaचीन