शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय; २५० स्थानकांवर होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 17:49 IST

प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात रेल्वेकडून पाचपट वाढ; गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय

ठळक मुद्देप्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात रेल्वेकडून पाचपट वाढदेशातल्या २५० रेल्वे स्थानकांवर नवे दर लागू प्लॅटफॉर्म तिकीटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार

नवी दिल्ली: कोरोनानं सर्वत्र घातलेल्या थैमानामुळे दहशतीचं वातावरण आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येतंय. मात्र काही ठिकाणी प्रशासनाच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. देशातले कोट्यवधी लोक दरदिवशी रेल्वेनं प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं प्लॅटफॉर्म तिकीटात वाढ केलीय. सध्या रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांना मिळतं. आता त्यात पाच पटींनी वाढ करण्यात आलीय. त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागतील. देशातल्या २५० रेल्वे स्थानकांवर नवे दर लागू करण्यात आले आहेत. रेल्वेतल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली. २५० रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये आकारले जातील. पश्चिम रेल्वेच्या मुंबई, बडोदा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर रेल्वे स्थानकांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचा दर ५० रुपये करण्यात आलाय. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी टाळण्याच्या हेतूनं प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर वाढवण्यात आल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. तिकीट दरात वाढ करण्यात आल्याची माहिती देताना अधिकाऱ्यानं मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयाकडे लक्ष वेधलं. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी तिकिटांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा अधिकार विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना देण्यात आल्याचा निर्णय पाच वर्षांपूर्वी घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १३० पेक्षा जास्त असून दररोज कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय. आज मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र या व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल अद्याप मिळाला नसल्याची माहिती आरोग्य मंत्री टोपेंनी दिली.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस