शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अल्पदरातील कोरोना चाचणीचा शोध; आयजीआयबीच्या शास्त्रज्ञांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:59 IST

इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजीने (आयजीआयबी) अल्प दरातील कोरोना चाचणीची पद्धत विकसित केली आहे.

नवी दिल्ली : इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटिव्ह बायोलॉजीने (आयजीआयबी) अल्प दरातील कोरोना चाचणीची पद्धत विकसित केली आहे. यामुळे कोरोनाची तपासणी करण्यासाठी कुठलेही महागडे यंत्र वापरण्याची गरज राहणार नाही. ‘फेलुदा’ असे या चाचणीला नाव देण्यात आले आहे.केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेच्या मार्गदर्शनाखाली आयजीआयबी ही संस्था कार्य करते. सत्यजित रे यांच्या कथेवरून या चाचणी पद्धतीला ‘फेलुदा’ असे नाव देण्यात आले आहे. शास्त्रज्ञ देबज्योती चक्रवर्ती आणि सौविक मेती यांनी या चाचणीचा शोध लावला आहे. अत्यंत साध्या पद्धतीने ‘सार्स कोविड २’ची तपासणी करण्यात यश आल्याचे आयजीआयबीचे संचालक अनुराग अग्रवाल यांनी सांगितले.गर्भवती तपासणी जशी केली जाते तशा पद्धतीने कोरोनाची तपासणी करता येणारी ही पद्धत आहे. पेपर स्ट्रीपच्या माध्यमातून कोरोनाच्या विषाणूचे अस्तित्व दिसते. एक तासापेक्षा कमी वेळेत ही चाचणी होऊ शकते.न्यूक्लिक अ‍ॅसिडच्या माध्यमातून ही चाचणी पार पडते. जर ही चाचणी व्यावसायिकरीत्या यशस्वी झाली, तर त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कुठल्याही पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये ही चाचणी होऊ शकणार आहे. महागडे पीसीआर मशिन्स या चाचणीसाठी लागत नाहीत.अत्यंत साध्या पद्धतीची थर्मो ब्लॉक असलेली चीप केवळ आवश्यक असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. एमआयटी, बरकले विद्यापीठ आणि कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठानेही वेगळे तंत्रज्ञान वापरून अशी चाचणी विकसित केली आहे. त्यामुळे या चाचणीचे वेगळेपण सिद्ध होण्यासाठी तिचे नाव ‘फेलुदा’ ठेवण्यात आल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे.हवाई वाहतूक मंत्रालय सीलहवाई वाहतूक मंत्रालयातील कर्मचाºयाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजीव भवन सील करण्यात आले आहे. राजीव भवनाच्या इमारतीतून मंत्रालयाचे काम चालते. नवी दिल्ली महानगरपालिकेने संपूर्ण मंत्रालयात औषध फवारणी केली. संबंधित कर्मचारी १५ एप्रिल रोजी कार्यालयात आला होता. त्यानंतर सात दिवसांनी त्यास कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. तात्काळ याची सूचना हवाई वाहतूक मंत्री हरदीप पुरी व सचिवांना देण्यात आली. सचिवांनी इमारत सील केली. कर्मचाºयाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन आदेश देण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या