शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
4
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
5
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
6
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
7
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
8
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
9
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
10
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
11
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
12
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
13
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
14
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
15
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
16
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
17
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
18
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
19
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
20
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले

Coronavirus: दर सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कशी होते, जाणून घ्या आकडेवारी मागचं गणित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 14:09 IST

सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळते. पण तुम्ही कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहिलं तर दरवेळी सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते

ठळक मुद्देमंगळवार ते शुक्रवारपर्यंत अचानक ही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होते देशात सध्या अडीच हजार लॅब आहेत. ज्याठिकाणी कोरोनाची चाचणी केली जाते. भारतात सध्याच्या घडीला १७ ते १९ लाख लोकांची चाचणी दिवसाला केली जाते

नवी दिल्ली -  भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. यावेळी भारत कोरोनाच्या लाटेतील सर्वात प्रभावित देश आहे. जगभरातील सर्वात जास्त रुग्ण भारतात सापडत आहेत. एप्रिलपासून देशात कोरोनानं कहर केला आहे. मे महिन्यात कोरोना आणखी भयंकर स्वरुपात येण्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. मे महिन्यापासून दिवसाला सरासरी ४ लाखापर्यंत कोरोना रुग्ण आढळत आहेत.

परंतु सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट पाहायला मिळते. पण तुम्ही कोरोनाच्या आकडेवारीकडे पाहिलं तर दरवेळी सोमवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते. त्यानंतर मंगळवार ते शुक्रवारपर्यंत अचानक ही संख्या वेगाने वाढते. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ का होते यामागे काय कारण आहे हे जाणून घेऊया

सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट कशी होते?

देशात सध्या अडीच हजार लॅब आहेत. ज्याठिकाणी कोरोनाची चाचणी केली जाते. कोरोना संकट काळात सुरुवातीपासून आतापर्यंत लॅबची संख्या सातत्याने वाढत आहे. भारतात सध्याच्या घडीला १७ ते १९ लाख लोकांची चाचणी दिवसाला केली जाते. परंतु सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत घट होण्यामागे चाचणी हेदेखील महत्त्वाचं कारण आहे.

देशातील विविध भागात सरकारी आणि खासगी लॅब रविवारी बंद राहतात. रविवारी फक्त काही लॅब सुरु असतात. त्यामुळे रविवारी चाचणी कमी केली जाते. जर रविवारी चाचण्यांची संख्या कमी असली तर सोमवारी रुग्णसंख्येत खूप मोठ्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून येते. जर तुम्ही मागील ५ सोमवारची आकडेवारी पाहिली तर त्याचा अंदाज येऊ शकतो.

१० मे – ३ लाख ६६ हजार ३१७ रुग्ण (सोमवार)

९ मे – १४ लाख ७४ हजार चाचणी(रविवार)

३ मे – ३ लाख ६८ हजार १४७ रुग्ण (सोमवार)

२ मे – १५ लाख चाचण्या(रविवार)

२६ एप्रिल – ३ लाख ५२ हजार ९९१ रुग्ण (सोमवार)

२५ एप्रिल – १४ लाख चाचण्या(रविवार)

१९ एप्रिल – २ लाख ७३ हजार ८१० रुग्ण (सोमवार)

१८ एप्रिल – १३ लाख ५६ हजार चाचणी (रविवार)

१२ एप्रिल – १ लाख ६८ हजार ९१२ रुग्ण (सोमवार)

११ एप्रिल – १४ लाख चाचणी(रविवार)

सोमवारनंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ  

देशात आठवड्याला सरासरी १ कोटी लोकांची चाचणी केली जाते. ज्यात आरटी पीसीआर आणि रॅपिड अँन्टिजेन चाचणी दोघांचाही समावेश असतो. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार या दिवशी जास्त चाचण्या केल्या जातात. पण सुट्टीच्या दिवशी चाचण्यांची संख्या कमी होते. भारतात सध्या दिवसाला ४ लाख रुग्ण सापडत आहेत. तर सक्रीय रुग्णांची संख्या आताही ३० लाखांच्या अधिक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या