शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जास्त चाचण्यांमुळे महाराष्ट्र रुग्णसंख्येत पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 06:46 IST

चाचण्यांच्या तुलनेत दिल्ली ८, तर पश्चिम बंगालमध्ये ६.८ टक्के रुग्ण

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या (कोविड-१९) रुग्णांची संख्या संपूर्ण देशात महाराष्ट्रात सर्वात जास्त असण्याचे कारण काय? प्रत्येक राज्य करत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रुग्ण टक्केवारीत महाराष्ट्र राज्य काही पहिल्या क्रमांकावर नाही तर ममता बॅनर्जी यांचा पश्चिम बंगाल व अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली राज्य आहे. उपलब्ध अधिकृत माहितीनुसार कोविड-१९ च्या चाचण्यांच्या तुलनेत सर्वात जास्त रुग्ण संख्या दिल्लीत ८ टक्के, त्यानंतर पश्चिम बंगाल ६.८ टक्के. जम्मू आणि काश्मीर मध्ये ५.५ टक्के रुग्ण चाचण्यांच्या तुलनेत उघडकीस आले. त्यानंतर महाराष्ट्र ५.४ टक्के.आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिओमोलॉजीकडील (एनआयई) माहितीनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त ६२ हजार चाचण्या झाल्या व त्यातून कोविड-१९ चे ५.४ टक्के रुग्ण समोर आले. देशभर राज्यांत होत असलेल्या चाचण्यांवर एनआयईचे लक्ष असते.आयसीएमआरने (इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) स्पष्ट केले की, ‘‘रिव्हर्स ट्रान्सस्क्रिप्शन-पॉलिमिरेझ चेन रिअ‍ॅक्शन (आरपी-पीसीआर) ही कोविड-१९ साठी खूप कार्यक्षम चाचणी असून रॅपिड अँटीबॉडी चाचणी ही तिची जागा घेऊ शकत नाही.’’ आयसीएमआरने म्हटले आहे की, ‘‘रॅपिड अँटीबॉडी टेस्टमुळे आम्हाला विशिष्ट भागात रोगाचा फैलाव किती झाला आहे याची कल्पना येते.सूत्रांनी म्हटले की, सरकार आरटी-पीसीआरचे निष्कर्ष काय आहेत हे विचारांत घेईल. या चाचणीचा अहवाल यायला ४८ तास लागतात. वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले की, ‘‘कोविड-१९ चे रुग्ण किती पसरले आहेत याचे निश्चित निष्कर्ष काढण्यासाठी येते १० दिवस फारच महत्वाचे आहेत.कुठे किती चाचण्या?दिल्लीत २२ हजार चाचण्या झाल्या असून तेथे ८ टक्के रुग्ण निघाले तर पश्चिम बंगालमध्ये पाच हजार चाचण्या घेण्यात आल्या व तेथे रुग्णांची टक्केवारी ६.८ टक्के आहे. उत्तर प्रदेशात २५ हजार चाचण्या केल्या गेल्या व रुग्ण ३.४ टक्के होते.उत्तर प्रदेश हे देशात सर्वात जास्त लोकसंख्येचे राज्य. देशात पश्चिम बंगाल हे फक्त पाच हजार चाचण्या झालेले एकमेव राज्य आहे. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने पाच लाख एवढ्या संख्येत रॅपिड अँटीबॉडी टेस्ट किटस राज्यांना दिल्या. या कीटस्द्वारे फक्त ३० मिनिटांत कोविड-१९ च्या चाचणीचा निकाल मिळतो; पण या नव्या कीटस्चा वापर अगदी आता सुरू झाला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस