शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गंगा पवित्रच! १६ ठिकाणांहून कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 20:54 IST

Coronavirus in India: कोरोनाबाधित मृतदेहांमुळे गंगेच्या पाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढणण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर गंगेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली होती.

वाराणसी - कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले असताना उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधित मृतदेह मोठ्या प्रमाणात गंगेमध्ये सोडले जात असल्याचे वृत्त आले होते. त्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. (Coronavirus in India) तसेच कोरोनाबाधित मृतदेहांमुळे गंगेच्या पाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढणण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर गंगेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. आता या कोरोना चाचणीचा अहवाल समोर आला आहे. ( Samples taken for corona test from 16 places were negative)

गंगेमध्ये एकूण १६ ठिकाणांहून गंगाजलाचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आली होती. त्यांची चाचणी लखनौ येथील बिरबल साहानी इंस्टिट्युट ऑफ पॅलिओ सायन्स येथे करण्यात आली. आश्चर्यकारक बाब म्हणजे इतर नद्यांमधील कोरोना चाचणीचे काही नमुने पॉझिटिव्ह येत असताना गंगेतील सर्व नमुन्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला असून, गंगा नदी ही पूर्वीप्रमाणेच पवित्र असल्याचा गृहितकाला दुजोरा मिळाला आहे.

वाराणसीमधील १६ ठिकाणांहून घेण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल येण्यासाठी सुमारे एका महिन्याचा अवधी लागला. मात्र दीर्घकाळानंतर आलेल्या या अहवालानंतर गंगाप्रेमींना दिलासा मिळाला आहे. बीएचयूमधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गंगाजलामध्ये असलेल्या औषधी गुणांमुळे असे घडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार गंगाजलाचे सर्व नमुने हे जिथे गंगेचे पाणी हे काहीसे संथ आहे अशा ठिकाणाहून गोळा करण्यात आलेले होते. तसेच ज्यावेळी गंगेमध्ये मृतदेह सोडण्यात येत होते अशा वेळीही गंगाजलाचे नमुने घेण्यात आले होते. आता तज्ज्ञ देशातील इतर नद्यांमधील नमुने घेऊन त्यांची तपासणी करणार आहेत. त्यामाध्यमातून गंगाजलामध्ये असलेल्या काही विशेष गुणधर्मामुळे नमुने निगेटिव्ह आलेत का याची चाचपणी करणात आहेत. दरम्यान, सध्या गंगेमध्ये शेवाळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. आता तज्ज्ञ या शेवाळांचा कोरोनाशी काही संबंधी आहे का याचाही शोध घेणार आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याriverनदी