शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: मृत्यूच्या ७५ दिवसानंतर कोविड संक्रमित रुग्णावर अंत्यसंस्कार; विलंबाचं कारण ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 12:03 IST

मेरठमध्ये एका कोविड संक्रमित रुग्णांचा मृतदेह तब्बल ७५ दिवस हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला होता.

ठळक मुद्देजवळपास अडीच महिने हा मृतदेह हॉस्पिटलने त्यांच्या शवगृहात ताब्यात ठेवला होता.मेरठमधील लाला लाजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील हा प्रकार आहेनरेशची पत्नी गुडीया आणि कुटुंबीय त्याचा मृतदेह आणण्यासाठी बस्तीहून हॉस्पिटलला आले होते.

मेरठ – कोरोनामुळं संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. या जीवघेण्या विषाणूमुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. घरातील कर्ता पुरूष गेल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले. कोरोना काळात काहींनी माणुसकी जपत केलेल्या कार्यामुळे सगळ्यांसमोर आदर्श घालून दिला. तर काही ठिकाणी माणुसकीला लाजवणाऱ्याही घटना घडल्या.  उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यात अशीच एक खळबळजनक घटना समोर आली आहे.

मेरठमध्ये एका कोविड संक्रमित रुग्णांचा मृतदेह तब्बल ७५ दिवस हॉस्पिटलच्या शवगृहात ठेवण्यात आला होता. लाला लाजपत राय मेमोरियल मेडिकल कॉलेजमधील हा प्रकार आहे. याठिकाणी नरेश नावाच्या कोरोना पीडिताचं १५ एप्रिल रोजी निधन झालं. नरेशची पत्नी गुडीया आणि कुटुंबीय त्याचा मृतदेह आणण्यासाठी बस्तीहून हॉस्पिटलला आले होते. परंतु १५ हजार न दिल्याने मृतदेह देण्यास हॉस्पिटलने नकार दिला. जवळपास अडीच महिने हा मृतदेह हॉस्पिटलने त्यांच्या शवगृहात ताब्यात ठेवला होता. या प्रकाराने लोकांमध्ये संताप निर्माण झाला.

नरेशच्या पत्नीने सांगितले की, डॉक्टरांनी नरेशचा मृतदेह घेण्यापूर्वी १५ हजार रुपये मागितले होते. परंतु माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावर डॉक्टर म्हणाले आम्हीच मृतदेहावर अंत्यसंस्कार करतो. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने नरेशच्या पत्नीचा आरोप फेटाळून लावला आहे. रुग्णासोबत त्याचा भाऊ विजय होता. जेव्हा १५ एप्रिलला रुग्ण नरेशचा मृत्यू झाला. तेव्हा विजयच्या नंबरवर कॉल केला तेव्हा तो नंबर बंद येत होता. पैशांची मागणी केली हा आरोप खोटा आहे. आमच्याकडे पर्यायी जागा उपलब्ध नव्हती. जेव्हा मृतदेह घेऊन जाण्यासाठी कोणी आलं नाही तेव्हा आम्ही मृतदेह हापुडला पाठवला असं हॉस्पिटल प्रशासनाचे डॉ. विदित दिक्षित यांनी सांगितले.

या प्रकरणात मेरठचे जिल्हाधिकारी के. बालाजी म्हणाले की, या संपूर्ण प्रकाराचा तपास करण्यासाठी आम्ही तपास पथक बनवलं आहे. हापुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. दिनेश खत्री यांच्या माहितीनुसार, खूप दिवसांपासून आम्ही मृतदेहाच्या कुटुंबीयांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. कोणीही या मृतदेहावर दावा केला नव्हता. जीएस कॉलेजच्या मोर्चरी विभागात मृतदेह ठेवण्यात आला. त्यानंतर आम्ही मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध घेतला. यात पोलिसांची मदत मागितली. जो नंबर दिला होता तो ट्रेस केला. त्यानंतर पोलिसांना गुडीयाचा पत्ता सापडला. तिला हापुडला बोलवण्यात आलं. २ दिवसांपूर्वीच तिच्या उपस्थितीत नरेशचं अंत्यसंस्कार करण्यात आलं. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या