नवी दिल्लीः कोरोना विषाणूनं जगभरात धुमाकूळ घातला असून, त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं अमेरिकेच्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी अमेरिकेला सध्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (hydroxychloroquine) औषधाची गरज आहे. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन हे औषध कोरोनावार रामबाण ठरत आहे. भारतानं या औषधाच्या निर्यातीवर निर्बंध लादले असल्यानं अमेरिकेला होणारी निर्यातही थांबली होती. त्यानंतर भारतानं हे निर्बंध न हटवल्यास कारवाई करू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेसचे नेते राहुल गांधींनीही उपदेशाचे डोस पाजले आहेत. राहुल गांधी यांनी ‘जीवन वाचवणारी’ ही औषधे सर्वात आधी भारतीयांना उपलब्ध करून द्यावीत, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे. “मैत्रीमध्ये बदला घेण्याची भावना योग्य नाही. भारताने या कठीण समयी सर्वच देशांना मदतीचा हात द्यायला हवा. पण जीव वाचवणारी ही औषधे सर्वात आधी भारतीयांना पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजेत, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
Coronavirus : राहुल गांधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भडकले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 18:46 IST