शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

Coronavirus: पहिल्यांदाच देशात ४ लाखांहून अधिक काेराेना रुग्ण बरे; ४,२२,४३६ रुग्ण एकाच दिवसात बरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 06:19 IST

कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे.

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी रोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठलेला असताना आता कोरोनातून बरे होणाऱ्यांचाही विक्रम झाला आहे. देशात प्रथमच चार लाखांहून अधिक कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या आत नोंदविण्यात आली, तर चार लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल ४ हजार ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे संसर्ग होणाऱ्या नव्या रुग्णांचा आलेख गेल्या काही दिवसांपासून घटत आहे. २ महिन्यांनी अडीच लाखांच्या जवळपास नवे रुग्ण नोंदविले आहेत. यापूर्वी २० एप्रिलला २ लाख ५९ हजार नवे रुग्ण नोंदविण्यात आले होते. 

या राज्यांमध्ये चढता आलेखविधानसभा निवडणूक झालेल्या राज्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ व पुदुच्चेरीमध्ये आलेख चढताच आहे. ओडिशा, आंध्र प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या हजाराखालीमुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या तीव्र लाटेनंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात मंगळवारी महाराष्ट्राने २ कोटींचा टप्पा ओलांडला. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. साेमवारी राज्यात १२३९ लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून सुमारे ९९,६९९ नागरिकांना लस देण्यात आली. महाराष्ट्राने आतापर्यंत २ कोटी ९० हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या