शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनावरील स्वदेशी लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण; जाणून घ्या निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 16:32 IST

CoronaVirus News: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड कोवॅक्सिन तयार करत आहेत.

मुंबई: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. कोरोनावर लस नेमकी कधी येणार, याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे. त्यातच स्वदेशी कोरोना लस कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या चाचणीचे निष्कर्ष अपेक्षेनुसार आहेत. हरयाणातल्या रोहतकमधल्या मेडिकल सायन्सेस पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूटमध्ये (पीजीआय) शनिवारी कोवॅक्सिनच्या मानवी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती चाचणी घेणाऱ्या वैद्यकीय पथकाच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली. पहिल्या टप्प्याच्या दुसऱ्या भागात ६ जणांना लस देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. लसीची पहिल्या टप्प्यातली चाचणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण भारतात ५० जणांना लस टोचण्यात आली. त्याचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत, असंदेखील वर्मा यांनी म्हटलं.कोरोनावरील कोवॅक्सिन लसीच्या पहिल्या मानवी चाचणीला १७ जुलैपासून सुरुवात झाली. त्या दिवशी पीजीआय रोहतकमध्ये तीन जणांना लस देण्यात आली. या लसीच्या पहिल्या टप्प्यातील मानवी चाचणीचे निष्कर्ष समाधानकारक आहेत. त्यामुळे भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. कोवॅक्सिनसोबतच ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरील लसीचीही मानवी चाचणी सुरू आहे. त्या चाचणीचे परिणामदेखील उत्साहवर्धक आहेत. लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढत असून अँटीबॉडीज तयार होत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे.केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोना रुग्णांचा आकडा १३ लाख ८५ हजार ५२२ वर पोहोचला आहे. यापैकी ३२ हजार ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ लाख ८५ हजार ५७६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ४ लाख ६७ हजार ८८२ जणांवर उपचार सुरू आहेत. 'तो' फक्त आणि फक्त मास्क लावून घराबाहेर पडला, रस्त्यावर फिरला अन्...माझं वय 85 नाही, पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवारांचं मिश्कील उत्तरशिवराज सिंह चौहान रुग्णालयात; असा आला पत्नी, मुलांचा कोरोना रिपोर्टदररोज पाच वेळा हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल - भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या