शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: बेडसाठी हॉस्पिटलच्या माराव्या लागल्या चक्करा; मृत्यूनंतरही १७ तास मृतदेह ताटकळत ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 08:37 IST

लालकुआ येथील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षण दिसत असल्याने १४ जुलै रोजी तपासणी केली. १६ जुलै संध्याकाळी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

ठळक मुद्देकोरोना प्रकरणात उत्तर प्रदेशातील आरोग्य विभागाचा बेजबाबदारपणा उघड रुग्णाची स्थिती गंभीर असतानाही एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला पाठवलंपीजीआय बेड मिळाला नाही, केजीएमयूने एरा मेडिकल हॉस्पिटलला नेण्यास सांगितले.

लखनऊ – कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे आरोग्य व्यवस्थेचेही धिंडवडे निघताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची लागण असलेल्या गंभीर महिला रुग्णाला बेडदेखील उपलब्ध झाला नाही. एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये चक्करा मारतानाच या महिलेने अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर तिच्या मृतदेहाला स्मशानभुमीत घेऊन जाण्यासाठीही नातेवाईकांना ताटकळत राहावं लागलं.

नातेवाईकांनी रुग्णालयाच्या अधीक्षकांना दोनदा विनवणी केली, त्यानंतर त्यांच्या आदेशानंतर तब्बल १७ तासांनी मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था झाली. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लालकुआ येथील ५७ वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षण दिसत असल्याने १४ जुलै रोजी तपासणी केली. १६ जुलै संध्याकाळी या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला लोकबंधू हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी या महिलेला हायर स्पेशाएलिस्ट हॉस्पिटलला घेऊन जाण्यास सांगितले. पहिले पीजीआय पाठवण्याचं सांगण्यात आलं त्यानंतर तिथे बेड उपलब्ध न झाल्याने केजीएमयू पाठवण्यात आलं.

केजीएमयूला घेऊन गेल्यानंतर त्याठिकाणी रुग्णाला बेड उपलब्ध झाला नाही, तेथील आरोग्य विभागाने रुग्णाला एरा मेडिकल कॉलेजमध्ये पाठवलं, शुक्रवारी रात्री ८ वाजता रुग्णवाहिकेतून महिला रुग्णाला एरा मेडिकल कॉलेजला पाठवलं. पण त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचं सांगितलं. कॉलेज टीमच्या हॉल्डिंग एरियामधून रुग्णवाहिका परत पाठवण्यात आली. रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारासाठी सीएमओ कंट्रोल रुमशी संपर्क साधला. लवकरच शववाहिका पाठवली जाईल असं आश्वासन मिळालं.

रात्री १२ पर्यंत शववाहिका येईल अशा सूचना नातेवाईकांना देण्यात आल्या. तरीही शववाहिका पोहचली नाही. वारंवार आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधल्यानंतर अखेर शनिवारी दुपारी शववाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर संध्याकाळी ४ च्या सुमारास कोविड १९ मार्गदर्शक सूचनेनुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वेळेवर उपचार न मिळाल्याने आईचा मृत्यू झाला, त्याला आरोग्य विभाग जबाबदार आहे असा आरोप महिला रुग्णाच्या मुलाने केला आहे.

याबाबत सीएमओ डॉ. नरेंद्र अग्रवाल म्हणाले की, आमच्याकडे तीन शव वाहन आहेत. जी शववाहिका उपलब्ध असेल ती तात्काळ पाठवण्यात येते. काही खासगी वाहनंही घेतली आहे, मात्र या प्रकरणात कोणी दिरंगाई केली याचा तपास करुन योग्य ती कारवाई केली जाईल.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल