शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: गुजरातमध्ये दररोज व्यक्त होतेय कृतज्ञता, महिनाभरापासून सुरुयं थाळी अन् टाळीचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:45 IST

मोदींच्या आवाहनुनसार देशभरात चहूबाजूने विस्तारलेल्या शहरात आणि ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींतही ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह दिसला. जवळपास १५ मिनीटांपर्यंत विविध

राजकोट - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानुसार २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनात कर्फ्युचं पालन केलं. त्यानंतर, दिवसभर जनता कर्फ्यूत सहभागी झालेल्या नागरिकांनी सायंकाळी ५ वाजता टाळी, थाळी, घंटा आणि शंखनाद करुन गो-कोरोना-गो अशी साद घातली. सुमारे १५ मिनीटे सुरु असलेल्या या उपक्रमानंतर नागरिक पुन्हा घरात विसावले. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्माचारी, पोलीस, डॉक्टर्स, नर्स आणि इतर नागरिकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी मोदींनी देशवासियांना टाळी अन् थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनाला देशवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे गुजरातमध्ये एका वसाहतीत आजही दररोज  सायंकाळी ५ वाजता घराबाहेर येऊन ही कृतज्ञता व्यक्त कली जात आहे.  

मोदींच्या आवाहनुनसार देशभरात चहूबाजूने विस्तारलेल्या शहरात आणि ग्रामीण हद्दीतील रहिवासी वसाहतींतही ‘नाद’ करण्यात मोठा उत्साह दिसला. जवळपास १५ मिनीटांपर्यंत विविध साहित्यासह डफ आणि ढोलचा नाद केल्यानंतर नागरिकांनी देशभक्तीचा नारा देत समारोप केला होता. यावेळी त्यांनी दिलेल्या भारतमाता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी काही नागरिकांनी चक्क रस्त्यावर येऊन रॅलीच काढली, तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासत एकत्र जमाव केला. विशेष म्हणजे मोदींनी केलेल्या या आवाहनाला उद्या १ महिना पूर्ण होत आहे. मात्र, २२ मार्चपासून आजतागायत गुजरातच्या राजकोट येथील एका रहिवासी वसाहतीमधील सर्वच नागरिक आजही अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. 

दररोज सांयकाळी ५ वाजता हे नागरिक आपल्या घरााबाहेर किंवा बाल्कीनत सोशल डिस्टन्सिंग पाळून एकत्र येतात. त्यानंतर, पुढील काही मिनिटांसाठी टाळी, थाळी आणि शंख नाद करतात. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे आता ३ मे पर्यंत हे नागरिक, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहेत. दरम्यान, ५ एप्रिल रोजी मोदींनी घरातील लाईट्स बंद करुन ९ मिनिटांसाठी दिवे, किंवा मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश एकत्र असल्याचा संदेश देण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनालाही नागरिकांनी उंदड प्रतिसाद दिला. 

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदी