शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दुकानदार अन् भाजीवाल्यांना मिळणार ई-पास; घरोघरी पोहोचवलं जाणार सामान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 14:31 IST

किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं.

ठळक मुद्देभारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ११ जण दगावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं.

नवी दिल्लीः देशात कोरोनानं अक्षरशः कहर केलेला आहे. भारतात कोरोनाचे रुग्ण ५६०च्या वर गेले असून, आतापर्यंत या जीवघेण्या रोगानं ११ जण दगावलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काल २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. रात्री सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची दुकानांबाहेर गर्दी पाहायला मिळाली. किराणा माल आणि भाजीपाल्याला खरेदी करण्याची मुभा दिली असतानाही लोकांनी घोळक्यानं, तर कुठे रांगेत उभे राहून गर्दी गेल्याचं चित्र होतं. त्यावर आता दिल्लीतल्या केजरीवाल सरकारनं तोडगा काढला आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यपाल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिल्लीतल्या दुकानदार आणि भाजीपाला विकणाऱ्यांना ई-पास देण्याची घोषणा केली आहे. लोकांनी घरातच थांबावे आणि दुकानांबाहेर गर्दी करू नये. तसेच लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण काल पाहिलं, त्यानंतर अत्यावश्यक सामान खरेदी करण्यासाठी दुकानांच्या बाहेर रांगाच्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. अत्यावश्यक सेवा देणारी दुकानं बंद करण्यात येणार नाहीत. मी जनतेला पुन्हा सांगू इच्छितो की, घाबरून सामान खरेदी करू नका. अत्यावश्यक सामानाचा कोणताही तुटवडा नाही. अत्यावश्यक सामान विक्रेत्यांना ई-पास देण्यात येणार आहे. जे कोणी आपली दुकानं आणि कारखाना उघडणार असतील, त्यांना ई-पासची सुविधा पुरविण्यात येणार आहे.  कोणत्याही समस्येसाठी हेल्पलाइन जारीकोणत्याही प्रकारच्या अडचणीसाठी हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आले आहेत. जर कोणालाही काही त्रास असल्यास हेल्पलाइन नंबर- 23469536 कॉल करून अडचण सांगावी.दिल्लीतल्या संक्रमितांची संख्या ३१वरआरोग्य विभागानुसार, मंगळवार संध्याकाळी दिल्लीत कोरोना संशयित सापडला आहे. त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळून आली असून, रिपोर्टही पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आरोग्य विभागानं रुग्णाचे तपासणी अहवाल पुन्हा पडताळून पाहण्यासाठी पुण्यातील आयसीएमआर लॅबमध्ये पाठवले आहेत. रिपोर्ट आल्यानंतरच रुग्ण कोरोनाबाधित आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या