शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Effect: खासगी बँका, कंपन्यांकडून कार्यालये सोडण्यास प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 02:20 IST

झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गापैकी १३ टक्के लोकांना जसे नव्या नोकºया शोधण्यास सांगितले आहे, तसेच १५०पैकी १२५ कार्यालये बंद करण्याचा निर्णयही या कंपनीने घेतला आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे बँकांपासून ते स्टार्ट-अप कंपन्यांच्या कार्यालयांतील बहुतांश कर्मचारी आता घरातूनच काम करत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला कंपन्यांनी कार्यालयासाठी भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागा आता रिकाम्या करण्यास सुरुवात केली आहे. खर्चात कपात करण्यासाठी हा मार्ग अवलंबण्यात आला आहे.झोमॅटो कंपनीने आपल्या कर्मचारीवर्गापैकी १३ टक्के लोकांना जसे नव्या नोकºया शोधण्यास सांगितले आहे, तसेच १५०पैकी १२५ कार्यालये बंद करण्याचा निर्णयही या कंपनीने घेतला आहे. झोमॅटोची प्रतिस्पर्धी कंपनी स्विगी १,१०० कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढणार आहे. तसेच किचन व कार्यालयांवरील खर्चही कमी करणार आहे.इंडसइंड बँकेने मुंबईमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या आपल्या कार्यालयांपैकी काही जागा रिकाम्या केल्या आहेत. कार्यालयांसाठी जागा भाड्यावर घेण्यासाठी होणाºया खर्चात कपात करण्याचे या बँकेने ठरविले आहे. क्युअरफिट या कंपनीने ८०० कामगारांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आपल्या व्यावसायिक केंद्रांची संख्या कमी करण्याचे या कंपनीने ठरविले आहे.आयटी कंपन्यांची उद्योगविषयक संस्था असलेल्या नॅसकॉमने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, लॉकडाऊनच्या काळात २५०पेक्षा अधिक स्टार्ट-अप कंपन्यांनी सध्या आपले काम थांबविले आहे किंवा कंपनीच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यालयांवर आपला सर्वाधिक खर्च होत असल्याने त्यात कपात करण्याचे काही कंपन्यांनी ठरविले आहे. सध्या कर्मचाºयांनी पूर्णवेळ किंवा काही प्रमाणात आपले काम घरातूनच करावे असा इ-मेल एका कंपनीच्या सीइओने आपल्या कर्मचाºयांना पाठविला आहे.

टॅग्स :bankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्या