शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: 'हॉटस्पॉट १७० जिल्हे ३ मेनंतरही खुले करू नका'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 04:25 IST

टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्याची कोविड-१९ राष्ट्रीय कृती दलाची शिफारस

नवी दिल्ली : देशभरात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संसर्ग पसरण्याच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (हॉटस्पॉट) आणि प्रतिबंधित भागातील निर्बंध सरसकट हटवून व्यवहार सुरू केल्यास स्थिती अधिक वाईट होण्यासह पुन्हा कोरोनाची साथ उफाळण्याची शक्यता पाहता देशभरातील २० राज्यांतील १७० हॉटस्पॉट जिल्ह्यांतील लॉकडाऊनचा काळ ३ मेनंतरही वाढविण्यात यावा, अशी शिफारस डॉ. व्ही.के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील २१ सदस्यीय उच्चाधिकार कृती दलाने केली आहे.धोकादायक (रेड झोन) ठरविण्यात आलेल्या १७० हॉटस्पॉट जिल्ह्यांतील स्थिती पुढच्या एक आठवड्यात न सुधारल्यास या हॉटस्पॉट जिल्ह्यांत निर्बंध कायम ठेवावेत, असे मत या कृती दलाने मांडल्याचे समजते. तथापि, कृती दलाच्या (टास्क फोर्स) स्थितीजन्य विश्लेषणानुसार उपरोक्त प्रतिबंधित भागात कोरोना उच्चपातळी गाठण्याची शक्यता ध्यानात घेता संवेदनशील आणि प्रतिबंधित भागातील निर्बंध शिथिल करणे जोखमीचे आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुन्हा मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक घेणार आहेत, तसेच अन्य विशेष गट या मुद्यांवर निष्कर्षावर पोहोचण्याआधीच कृती दलाने व्यक्त केलेल्या उपरोक्त मताला महत्त्व प्राप्त होते.डॉ. व्ही.के. पॉल हे नीती आयोगाचे सदस्यही (आरोग्य) आहेत. कोविड-१९ शी संबंधित विविध पैलूंवर विचार करून कोरोनाची साथ पूर्णत: नियंत्रणात आणण्यासाठी उपायोजना सुचविण्यासाठी पंतप्रधानांनी २९ मार्च रोजी १० प्रमुख गट आणि कृती दल स्थापन केले होते.लॉकडाऊन कायम ठेवारुग्णांची संख्या दुपटीने वाढत असलेल्या मोठ्या लोकवस्ती किंवा जिल्ह्यांत ३ मेनंतरही पूर्णत: लॉकडाऊन कायम ठेवला जावा, असे मत कोविड-१९ संबंधित राष्ट्रीय कृती दलाने मांडले आहे.तथापि, एकच रुग्ण असलेल्या भागातील स्थिती सुधारत असल्याची चिन्हे दिसणाऱ्या भागातील लॉकडाऊन अंशत: हटविण्यास कृती दलाचा विरोध नाही.तथापि, राज्य सरकारने कोविडग्रस्त किंवा कोविडमुक्त भागातील सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत दक्षता घेणे जरूरी आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण720जिल्ह्यांपैकी देशभरात हॉटस्पॉट जिल्हे १७० असल्याने हॉटस्पॉट भागाचे प्रमाण २३ टक्के असले तरी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे प्रमाण महत्त्वाचे असून, या भागातील लोकसंख्येचे प्रमाण ३६ टक्के आहे.69 टक्के रुग्णांत लक्षणे नाहीत, तरीही अपेक्षाकृत नसलेल्या भागांतही रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आॅरेंज किंवा ग्रीन झोनमधील स्थितीबाबत कृती दल साशंक आहे. आरोग्यतज्ज्ञही १७० हॉटस्पॉट जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याच्या विरोधात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या