शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Coronavirus :"कोरोना वाईट, खूप वाईट, प्लिज दुर्लक्ष करू नका…,’’ अखेरच्या व्हिडीओमधून गर्भवतीचे भावूक आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 22:30 IST

Coronavirus in India: या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने डोळ्यांत पाणी आणणार हा भावूक व्हिडीओ शेअर केला आहे.

नवी दिल्ली - हॅलो एव्हरीवन, हा व्हिडीओ तयार करताना मला खूप त्रास होत आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितेय की, कोरोनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्याची लक्षणे वाईट आहेत. खूप वाईट आहेत. मला नीट बोलणेही शक्य होत नाही आहे. पण मला माझे आवाहन तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे. जेव्हा घराबाहेर पडाल, कुणाशी बोलत असाल, तेव्हा प्लिज मास्क वापरा, हे भावूक शब्द आहेत एका गर्भवतीचे. जिचा काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाई ती हरली. मात्र अखेरच्या व्हिडीओमधून तिने लोकांना कोरोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. ("Do not take the corona lightly ...", emotional appeal from pregnant woman from the last video) 

या महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने डोळ्यांत पाणी आणणार हा भावूक व्हिडीओ शेअर केला आहे. या महिलेचे नाव दीपिका होते. ११ एप्रिल रोजी तिचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोनाशी झुंजत असताना तिने १७ एप्रिल रोजी हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. मात्र नंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि २६ एप्रिल रोजी ती कोरोनाविरोधातील लढाई हरली. पती आणि अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलाला मागे सोडून तिने जगाचा निरोप घेतला. 

तिच्या मृत्युनंतर तिच्या पतीने हा व्हिडीओ शेअर करून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. या व्हिडीओत ती पुढे म्हणते की, तुम्ही मास्क अवश्य वापरा. मग तुम्ही घरात असा वा घराबाहेर मास्क जरूर वापरा. तुमच्या निकटवर्तीयांना सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क वापरा. मी अपेक्षा करते की, अशी वेळ कुणावरही येऊ नये. विशेष करून गर्भावस्थेमध्ये. कृपया आपल्या कुटुंबीयांना सांगा की, कोरोनाकडे दुर्लक्ष करू नका. त्याला अजिबात हलक्यात घेऊ नका. प्लिज, बेजबाबदार बनू नका.  

दीपिकाचे पती रवीश चावला यांनी हा व्हिडीओ ९ मे रोजी ट्विटरवर शेअर केला होता. रवीश यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिले की,  ती पूर्णपणे मातृत्वासाठी समर्पित होती. ती तिच्या जन्म न झालेल्या बाळासह स्वर्गवासी झाली आणि साडेतीन वर्षांच्या मुलाला माझ्याकडे सोडून गेली. मदर्स डेच्या शुभेच्छा, दीपिका!  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWomenमहिलाDeathमृत्यूdelhiदिल्लीSocial Viralसोशल व्हायरल